IPL 2026: या हंगामानंतर या पाच संघांच्या नेतृत्वात बदल होणार! कसं काय ते जाणून घ्या
आयपीएल 2026 स्पर्धेत काही बलाढ्य संघांची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स हे स्पर्धेतून बाद होणारे पहिले दोन संघ ठरले. असं असताना पुढच्या पर्वात काही संघांच्या नेतृत्वात बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे. चला जाणून घेऊयात...

आयपीएल 2026 काही दिग्गज संघांची निराशाजनक राहिली. या संघांना कमकुवत नेतृत्व लाभल्याने असं झाल्याची टीका होत आहे. असं असताना काही संघांच्या कर्णधारांवर टांगती तलवार आहे. पाच संघ या पर्वानंतर नेतृत्व बदल करण्याची दाट शक्यता आहे. चला जाणून घेऊयात त्या संघांबाबत..

लखनौ सुपर जायंट्स संघाची या स्पर्धेतील कामगिरी निराशाजनक राहिली आहे. या पर्वात लखनौ सुपर जायंट्सने 11 पैकी 8 सामने गमावले आणि फक्त तीन सामन्यात विजय मिळवला. त्यामुळे हा संघ तळाशी राहिली असून स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. 2025 च्या आयपीएलमध्ये 14 पैकी आठ सामने गमावून सातव्या स्थानावर राहिला होता. त्यामुळे पुढच्या पर्वात ऋषभ पंतकडून जबाबदारी काढून घेतली जाण्याची शक्यता आहे.

अक्षर पटेलच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्स संघ 2025 मध्येही प्लेऑफमध्ये पोहोचण्यात अपयशी ठरला. आता, 2026 मध्येही संघाच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याची शक्यता कमी आहे. कर्णधार झाल्यानंतर अक्षर पटेलच्या कामगिरीतही घसरण झाली आहे. त्यामुळेच दिल्ली संघ २०२७ च्या हंगामासाठी नवीन कर्णधाराची नियुक्ती करू शकतो.

पाच वेळचे चॅम्पियन मुंबई इंडियन्सची या पर्वात कामगिरी चांगली नाही. लखनौनंतर स्पर्धेतून बाद होणारा दुसरा संघ आहे. दिग्गज खेळाडू असूनही अशी स्थिती झाल्याने या फ्रेंचायझीवर टीका होत आहे. त्यामुळे हार्दिक मुंबई संघ सोडून जाऊ शकतो अशा अफवा पसरल्या आहेत. 2027 मध्ये मुंबई इंडियन्स हार्दिकऐवजी दुसऱ्या कोणालातरी कर्णधार म्हणून नियुक्त करण्याची शक्यता आहे.

अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात आयपीएलमध्ये सात सामने गमावलेल्या केकेआरची या चालू हंगामातही सुरुवात खराब झाली आहे. त्यानंतर संघाने सलग चार सामने जिंकले आणि प्लेऑफच्या शर्यतीत आहे. केकेआरने आपले सर्व सामने जिंकले तरीही प्लेऑफमध्ये पोहोचण्याची शक्यता कमी आहे. परिणामी, केकेआर 2027 च्या हंगामापूर्वी नवीन कर्णधाराची नियुक्ती करू शकते.

2025 च्या आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सची कामगिरी खराब झाली होती. 14 पैकी 10 सामने गमावून संघ शेवटच्या स्थानावर राहिला. या हंगामातही संघाची कामगिरी खराब असून प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी संघर्ष करत आहे. कर्णधारपदाच्या दबावाखाली ऋतुराजच्या फलंदाजीची कामगिरीही खालावली आहे. संघात संजू सॅमसनसारखा अनुभवी खेळाडू असल्याने त्याला कर्णधारपद मिळू शकते. (सर्व फोटो: टीव्ही 9 कन्नडवरून)