
डेविड बेकहम... फुटबॉल खेळातील महान व्यक्तींच्या यादीतील अव्वल नाव... ज्याने फुटबॉलसाठी इंग्लंडचं प्रतिनिधित्व केलं... तो डेविड बेकहम सध्या भारत दौऱ्यावर आहे.

भारत दौऱ्यात डेविड बेकहम याने अनेक दिग्गजांच्या भेटी घेतल्या. बॉलिवू़डचा किंग शाहरूख खानची त्याने भेट घेतली. एका आयकॉनसोबत काही वेळ घालवला, असं म्हणत शाहरुखने हा फोटो शेअर केलाय.

15 नोव्हेंबरला झालेली भारत न्युझिलंड सेमी फायनल मॅच पाहण्यासाठीही डेविड बेकहम वानखेडे मैदानावर पोहोचला होता. यावेळी त्याने क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरची भेट घेतली. या खास भेटीचा हा फोटो...

डेविड बेकहमसाठी अभिनेत्री सोनम कपूरच्या घरी ग्रँड वेलकम पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या पार्टीतील हा खास फोटो...

डेविड बेकहमसोबत घालवलेली एक सुंदर संध्याकाळ... म्हणत आदित्य यांनी हा फोटो शेअर केलाय. तसंच या भेटीसाठी सोनमचे आभार मानलेत.