कर्णधार गिलचा टीम इंडियातून पत्ता कापणार? नेमकं काय घडतंय? माजी क्रिकेटपटूच्या विधानाने खळबळ

टीम इंडियात जागा मिळवणं आणि जागा मिळाली की ती टिकवणं ही मोठी बाब आहे. सध्या टीम इंडियात कामगिरी करा नाही तर बाहेरचा रस्ता अशी स्थिती आहे. त्यामुळे कर्णधार शुबमन गिलचं संघातील स्थान डळमळीत मानलं जात आहे. माजी क्रिकेटपटूच्या विधानाने खळबळ उडवून दिली आहे.

| Updated on: Jul 27, 2026 | 9:47 PM
1 / 5
टीम इंडियात स्थान टिकवून ठेवण्यासाठी चांगली कामगिरी करणं आवश्यक आहे. जर तसं नाही झालं तर सुरूवातीला प्लेइंग 11 आणि नंतर संघातून पत्ता कापला जाऊ शकतो. इतकंच काय तर कर्णधार शुबमन गिलचं स्थानही पक्कं नाही. माजी क्रिकेटपटू दीप दासगुप्ता यांच्या मते, टीम इंडियात खूप तीव्र स्पर्धा आहे. (PC-PTI)

2 / 5
दीप दासगुप्ता यांनी सांगितलं की, वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेसाठी आता फक्त 14 महिन्यांचा अवधी शिल्लक आहे.  शुबमन गिलने चांगली कामगिरी केली नाही त्याचं स्थानही संकटात येईल. कर्णधार असला तरी त्याच्यावर गदा येऊ शकते. (PC-PTI)

3 / 5
दीप दासगुप्ता यांनी सांगितलं की विराट कोहली, रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांना दुसऱ्या खेळाडूंच्या तुलनेत अधिक संधी मिळाल्या. कारण त्यांची आकडेवारी चांगली आहे. पण आता त्यांनाही कामगिरी करावी लागणार आहे. (PC-PTI)

4 / 5
दीप दासगुप्ता यांच्या मते, सध्या तरी गिल सर्वात सुरक्षित आहे. कारण त्याच्याकडे कर्णधारपद आहे. 2023 पासून आतापर्यंत त्याची वनडेतील कामगिरी चांगली आहे. 2025 मध्ये 8 डावात त्याने 561 धावा केल्या. यात एक शतक आणि पाच अर्धशतकांचा समावेश आहे. गिलने 93.5 च्या सरासरीने आणि 110.65 च्या स्ट्राईक रेटने या धावा केल्या आहेत. (PC-PTI)

5 / 5
वनडे क्रिकेटमधील रोहित शर्माची जागा संकटात आहे. इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेतील शेवटच्या सामन्यात शतक ठोकलं. पण असं असूनही त्याला वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेतून डावललं जाण्याची शक्यता आहे. (PC-PTI)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us