Cricket : सामन्यादरम्यान बेशुद्ध झालेल्या 38 वर्षीय भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू, क्रीडा वर्तुळात शोककळा

K Lalremruata Died : मिझोरमसाठी 2018 साली प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या या खेळाडूला स्थानिक स्पर्धेदरम्यान खेळताना अचानक त्रास जाणवला. त्यानंतर हा खेळाडू बेशुद्ध झाला. मात्र त्यानंतर या खेळाडूची प्राणज्योत माळवली.

| Updated on: Jan 09, 2026 | 9:38 PM
1 / 5
भारतीय क्रिकेट वर्तुळातून अतिशय वाईट बातमी समोर आली आहे. सामन्यादरम्यान बेशुद्ध झालेल्या क्रिकेटपटूचं उपचारादरम्यान निधन झालं आहे. लालरेमरुआटा असं निधन झालेल्या क्रिकेटरचं नाव आहे.  मिझोरममध्ये आयोजित स्थानिक क्रिकेट स्पर्धेत हा खेळाडू बेशुद्ध होऊन मैदानात पडला. हा खेळाडू रणजी ट्रॉफी स्पर्धेतही खेळला होता. (Photo: Lalremruata's Instagram)

2 / 5
रिपोर्ट्सनुसार, लालरेमरुआटा 8 जानेवारीला एका स्पर्धेत खेळत होता. लालरेमरुआटा या दरम्यान बेशुद्ध होऊन मैदानात पडला. त्यानंतर लालरेमरुआटा याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी क्रिकेटरचा मृत्यू झाल्याचं जाहीर केलं. (Photo: Lalremruata's Instagram)

3 / 5
लालरेमरुआटाच्या निधनानंतर मिझोरमच्या क्रीडा मंत्र्यांनी शोक व्यक्त केला. क्रीडा मंत्र्यांनी लालरेमरुआटाच्या कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केलं.  वेंगनुआय विरुद्ध चॉनपुई यांच्यातील सामन्यात लालरेमरुआटा याला श्वास घेण्यास त्रास जाणवल्याचं क्रीडा मंत्र्यांनी सांगितलं.  (Photo: Lalremruata's Instagram)

4 / 5
लालरेमरुआटा याने मिझोरमचं रणजी ट्रॉफी स्पर्धेतील 2 सामन्यांत प्रतिनिधित्व केलं होतं. तसेच लालरेमरुआटाने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत 7 टी 20i सामने खेळले होते. मिझोरम क्रिकेट असोसिएशनने आपल्या माजी खेळाडूच्या निधनानंतर दु:ख व्यक्त केलं. (Photo: Lalremruata's Instagram)

5 / 5
लालरेमरुआटा याने 2018 साली मिझोरमकडून फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. मात्र लालरेमरुआटा याला त्यानंतर थेट 2022 साली रणजी ट्रॉफी स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली. मात्र त्यानंतरही लालरेमरुआटा फक्त 17 धावाच करता आल्या.  मिझोरमच्या खेळाडूने 2019 ते 2021 दरम्यान 7 टी 20 सामन्यांमध्ये 87 धावा केल्या. (Photo Credit : Lalremruata's Instagram)