
ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अफ्रिका यांच्यातील टी20 मालिका रंगतदार वळणावर आहे. आतापर्यंत पार पडलेल्या दोन सामन्यात 1-1 अशी बरोबरी आहे. त्यामुळे शेवटच्या सामन्यावर सर्वांच्या नजरा खिळल्या आहे. (Photo- South Africa Cricket Twitter)

ऑस्ट्रेलियाने पहिल्या सामन्यात विजय मिळवून आघाडी घेतली होती. पण दुसऱ्या सामन्यात दक्षिण अफ्रिकेने जोरदार कमबॅक केलं आणि ऑस्ट्रेलियाला बॅकफूटवर ढकललं. आता तिसरा सामना मालिका विजयासाठी महत्त्वाचा आहे. (Photo- South Africa Cricket Twitter)

या मालिकेत ऑस्ट्रेलियाचा स्टार अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल काही खास करू शकलेला नाही. फलंदाजीत पूर्णपणे फेल गेला आहे. पण गोलंदाजीत कमाल करत असून इतिहास रचण्याची संधी आहे. (Photo- PTI)

दक्षिण अफ्रिकेविरुद्ध शेवटच्या टी20 सामन्यात एक विकेट घेताच त्याचं अर्धशतक पूर्ण होणार आहे. तर ऑस्ट्रेलियाचा पहिला खेळाडू ठरेल की त्याच्या नावावर 2500 हून धावा आणि 50 विकेट आहेत. (Photo- PTI)

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत अशी कामगिरी फक्त तीन खेळाडूंना जमली आहे. यात शाकिब अल हसन, मोहम्मद हफीज आणि मलेशियाच्या वीरनदीप सिंहचा नाव आहे. आता यात मॅक्सवेलचं नाव जोडलं जाईल. (Photo- Getty Image)