IPL 2026: शुबमन गिलकडून नव्या विक्रमाची नोंद, 4000 धावा करत विराटच्या पुढे निघून गेला
आयपीएल 2026 स्पर्धेतील 19व्या सामन्यात गुजरात टायटन्सने लखनौ सुपर जायंट्सला 7 गडी राखून पराभूत केलं. या सामन्यात कर्णधार शुबमन गिलने कर्णधारपदाला साजेशी कामगिरी केली. तसेच विराट कोहलीचा एक मोठा विक्रम मोडीत काढला.

आयपीएल 2026 स्पर्धेत शुबमन गिलला पुन्हा एकदा सूर गवसल्याचं दिसत आहे. या स्पर्धेत त्याने सलग दुसरं अर्धशतक ठोकलं आहे. लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध 165 धावांचा पाठलाग करताना त्याचं अर्धशतक निर्णायक ठरलं. यावेळी एक मोठा विक्रम रचला. (Photo- Gujarat Titans Twitter)

शुबमन गिलने 40 चेंडूत 6 चौकार आणि 1 षटकार मारत 56 धावांची खेळी केली. यासह शुबमन गिलने आयपीएल कारकिर्दीत 4 हजार धावांचा पल्ला गाठला आहे. 4 हजार धावा करताच त्याने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. (Photo- Gujarat Titans Twitter)

शुबमन गिलने 26 वर्षे आणि 216 दिवसांचा असताना आयपीएल स्पर्धेत 4 हजार धावा पूर्ण केल्या. यासह आयपीएलमध्ये 4 हजार धावा गाठणारा युवा फलंदाज ठरला. यापूर्वी हा विक्रम विराट कोहलीच्या नावावर होता. त्याने 24 वर्षे आणि 195 दिवसांचा असताना हा विक्रम केला होता. (Photo- Gujarat Titans Twitter)

शुबमन गिलने 4000 धावा करण्यासाठी सर्वात कमी चेंडूंचा सामना केला. या यादीत शुबमन गिल दुसऱ्या स्थानावर आहे. सूर्यकुमार यादवने हा टप्पा गाठण्यासाठी 2714 चेंडू घेतले होते. तर शुबमन गिललने 2875 चेंडूत 4000 धावा पूर्ण केल्या आहेत. (Photo- Gujarat Titans Twitter)

शुबमन गिलने कमी डावात 4000 धावा गाठणारा दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. यासाठी शुबमन गिल 118 डाव खेळला. तर या यादीत केएल राहुल पहिल्या स्थानावर असून त्याने 4000 धावा 105 डावात केल्या होत्या. (Photo- Gujarat Titans Twitter)