
आशिया कप सुपर 4 मध्ये पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर भारतीय संघ आता बांगलादेशचा सामना करण्यासाठी सज्ज झाला आहे. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर दोन्ही संघ एकमेकांसमोर येतील. अंतिम फेरीसाठी दोन्ही संघांना विजय महत्त्वाचा आहे. (फोटो- बीसीसीआय ट्वीटर)

बांगलादेशविरुद्धच्या या सामन्यात सर्वांचे लक्ष हार्दिक पंड्यावर असेल. हार्दिक पांड्या इतिहास रचण्यासाठी मैदानात उतरेल. हार्दिक टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये एका मोठ्या टप्पा गाठण्यापासून फक्त तीन विकेट्स दूर आहे. (फोटो- बीसीसीआय ट्वीटर)

बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्या तीन विकेट्स घेऊ शकला तर तो 100 विकेट्सचा टप्पा गाठेल. हा विक्रम करणारा तो दुसरा भारतीय खेळाडू ठरेल. यापूर्वी हा विक्रम अर्शदीप सिंगने केला आहे. (फोटो- बीसीसीआय ट्वीटर)

हार्दिक पंड्या हा या फॉरमॅटमध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 118 सामन्यांमध्ये 26.63 च्या सरासरीने 97 विकेट घेतल्या आहेत. अर्शदीपच्या नावावर 100 विकेट आहेत. (फोटो- बीसीसीआय ट्वीटर)

हार्दिकने आतापर्यंत आशिया कपच्या चार सामन्यांमध्ये तीन विकेट घेतल्या आहेत. पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानविरुद्धच्या सुपर 4 च्या शेवटच्या सामन्यात त्याने तीन षटकांत 29 धावा देत 1 विकेट घेतली. (फोटो- बीसीसीआय ट्वीटर)