
भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात 9 डिसेंबरपासून टी20 मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेपूर्वी टीम इंडियाच्या गोटात आनंदाचं वातावरण आहे. कारण अष्टपैलू हार्दिक पांड्या फिट अँड फाईन असल्याची माहिती समोर आली आहे. इतकंच काय बीसीसीआयने त्याला गोलंदाजी करण्याची परवानगीही दिली आहे. (फोटो-पीटीआय)

हार्दिक पांड्या बंगळुरूच्या सेंटर ऑफ एक्सिलेंसमध्ये उपचार घेत होता. 21 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबरपर्यंत सीओईमध्ये होता. मिडिया रिपोर्टनुसार, सीओईने त्याला टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत खेळणार हे निश्चित झालं आहे. (फोटो-पीटीआय)

दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या टी20 मालिकेपूर्वी हार्दिकपांड्यात दोन टी20 सामने खेळणार आहे. सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत 2 डिसेंबरला पंजाब विरुद्ध आणि 4 डिसेंबरला गुजरात विरुद्ध मैदानात उतरेल. (फोटो-पीटीआय)

हार्दिक पांड्याच्या गोलंदाजी, फलंदाजी आणि फिटनेसवर निवडकर्ते प्रज्ञान ओझा नजर ठेवून असेल. त्यांच्यावर बीसीसीआयने ही जबाबदारी सोपवली आहे. आता देशांतर्गत क्रिकेटमध्ये हार्दिक पांड्या कशी कामगिरी करतो याकडे लक्ष लागून आहे. (फोटो-पीटीआय)

हार्दिक पांड्याचं कमबॅक वाटतं तितकं सोपं नाही. कारण सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत समोर पंजाबचा संघ असणार आहे. त्यात अभिषेक शर्मासारखा आक्रमक फलंदाज आहे. त्याने मागच्या सामन्यात बंगालविरुद्द 32 चेंडूत शतक ठोकलं होतं. आतापर्यंत त्याने 16 षटकार मारलेत. (फोटो-पीटीआय)