हरमनप्रीत कौरने इंग्लंडमध्ये केली मोठी कामगिरी, असं करणारी दुसरी भारतीय

भारत आणि इंग्लंड यांच्यात वनडे मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना सुरु आहे. या मालिकेत 1-1 अशी बरोबरी आहे. त्यामुळे तिसरा सामना जिंकेल त्याच्या खिशात मालिका जाईल. या सामन्यात हरमनप्रीत कौरने कर्णधारपदाला साजेशी कामगिरी केली. शतकी खेळीसह एक विक्रम नावावर केला आहे.

| Updated on: Jul 22, 2025 | 9:10 PM
1 / 5
भारताने तिसऱ्या आणि निर्णायक वनडे सामन्यात इंग्लंडसमोर 319 विजयासाठी धावांचं आव्हान ठेवलं आहे. या सामन्यातील विजयी संघाला मालिका विजयाचा मान मिळणार आहे. त्यामुळे हा या सामन्यातील विजयासाठी दोन्ही संघांची धडपड आहे. (Photo- BCCI)

2 / 5
तिसऱ्या वनडे सामन्यात भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर हीची बॅट चांगलीच तळपली. तिने 84 चेंडूत 14 चौकारांच्या मदतीने 121.43 च्या स्ट्राईक रेटने 102 धावा केल्या. तसेच एका विक्रमाला गवसणी घातली आहे. तिचं हे वनडे क्रिकेटमधील सातवं शतक आहे.  वनडे क्रिकेटमध्ये तिने इंग्लंडविरुद्ध हे तिसरं शतक ठोकलं आहे.  (Photo- BCCI)

3 / 5
क्रिकइन्फोच्या मते , हरमनप्रीत आता भारतासाठी संयुक्तपणे दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक एकदिवसीय शतके करणारी फलंदाज ठरली आहे. तिच्या नावावर सात शतके असून तिने मितालीची बरोबरी केली आहे. स्मृती मंधानाच्या नावावर वनडेत 11 शतके आहेत.  (Photo- BCCI)

4 / 5
हरमनप्रीत कौर इंग्लंडमध्ये 1000 धावा करणारी दुसरी भारतीय महिला ठरली आहे. यापूर्वी भारताची माजी कर्णधार मिताली राज हीने हा कारनामा केला आहे. मिताली राजने 41 सामन्यातील 39 डावात 48.59 च्या स्ट्राईक रेटने 1555 धावा केल्या आहेत. (Photo- BCCI)

5 / 5
हरमनप्रीत कौरने वनडे क्रिकेटमध्ये 4 हजार धावांचा पल्लाही गाठला आहे. हरमनप्रीत कौर ही अशी कामगिरी करणारी महिला संघाची तिसरी फलंदाज आहे. यापूर्वी मिताली राज आणि स्मृती मंधानाने हा विक्रम केला आहे.  (Photo- BCCI)