
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे मालिकेतील दुसरा सामना जिंकत कांगारूंनी मालिका खिशात घातली आहे. यानंतर आता आयसीसी वनडे क्रमवारीत बदल झाला आहे. ऑस्ट्रेलियाला मोठा फायदा झाला आहे.

सलग दोन विजयांमुळे ऑस्ट्रेलियाने आयसीसी वनडे क्रमवारीत एका स्थानाची झेप घेतली आहे. या मालिकेपूर्वी कांगारूंचा संघ तिसऱ्या स्थानावर होता, मात्र आता तो दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.

ऑस्ट्रेलियाचे रेटिंग गुण आता 110 आहेत. ऑस्ट्रेलियाच्या विजयामुळे न्यूझीलंडला फटका बसला आहे, हा संघ 109 च्या रेटिंगसह तिसऱ्या स्थानावर घसरला आहे.

वनडे क्रमवारीत भारतीय संघ अव्वल स्थानावर कायम आहे. भारताचे रेटिंग सध्या121 आहे. सलग दोन सामने गमावल्यानंतर भारताचे रेटिंग घसरले आहे. मात्र तरीही संघ पहिल्या क्रमांकावर आहे.

आता तिसऱ्या सामन्यात भारताने विजय मिळवला तर ऑस्ट्रेलिया तिसऱ्या स्थानावर घसरणार आहे. कारण ऑस्ट्रेलियाचा सध्याचे रेटिंग 110 आहे, मात्र पुढील सामन्यात त्यांचा पराभव झाल्यास रेटिंग 109 होईल.