
आयसीसी टेस्ट रँकिंग जाहीर केली आहे. या रँकिंगमध्ये न्यूझीलंड क्रिकेट टीमचा केन विलियमसन अव्वल स्थानी कायम आहे. तर ऑस्ट्रेलियाचा अनुभवी फलंदाज स्टीव्हन स्मिथ याला मोठा झटका लागलाय. स्मिथ थेट दुसऱ्यावरुन चौथ्या स्थानी घसरलाय. स्मिथला इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत शतक ठोकून नंबर होण्याची संधी होती. मात्र स्मिथ दोन्ही डावात सपशेल अपयशी ठरला. त्यामुळे स्मिथला मोठं नुकसान झालंय.

या रँकिंगमध्ये ऑस्ट्रेलियाचा ट्रेव्हिस हेड दुसऱ्या क्रमांकावर पोहचलाय. ट्रेव्हिसने दोघांना मागे टाकत दुसरं स्थान पटकावलंय. तर पाकिस्तान क्रिकेट टीम कॅप्टन बाबर आझम तिसऱ्या स्थानावर आलाय.

मार्नस लाबुशेन बॅटिंग रँकिंगमध्ये काही दिवसांआधी नंबर 1 होता. मात्र आता मार्नसची कामगिरी ढासळल्याने त्याला फटका बसलाय. लाबुशेन पाचव्या क्रमांकावर आलाय. तर इंग्लंडचा जो रुट हा सहाव्या क्रमांकावर आहे.

आर अश्विन गोलंदाजांच्या यादीत नबंर 1 आहे. अश्विनने अव्वल स्थान गेल्या अनेक महिन्यांपासून राखून ठेवलंय.

तसेच ऑलराउंडर रविंद्र जडेजा हा देखील अव्वलस्थानी कायम आहे.

भारतीय क्रिकेट संघ टीम रँकिगंमध्ये कसोटी आणि टी 20 मध्ये एक नंबर आहे. तर ऑस्ट्रेलिया वनडेत एक नंबर टीम आहे.