
विराट कोहली आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेतील प्लेअर ऑफ द टुर्नामेंट पुरस्काराचा प्रबळ दावेदार आहे. विराटने या स्पर्धेत आतापर्यंत 10 सामन्यांमध्ये 711 धावा केल्या आहेत. विराटने या खेळीत 3 शतकं आणि 5 अर्धशतकं झळकावली आहेत.

विराटसमोर प्लेअर ऑफ द टुर्नामेंट या पुरस्कारासाठी सहकारी मोहम्मद शमी याचंच आव्हान आहे. शमीने या वर्ल्ड कपमधील 6 सामन्यांमध्ये सर्वाधिक 23 विकेट्स घेतल्या आहेत.

टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याचाही या यादीत समावेश आहे. रोहितने 10 सामन्यांमध्ये 550 धावा केल्या आहेत. विराटच्या तुलनेत रोहितच्या धावा कमी आहेत, मात्र रोहित या पुरस्कारासाठी प्रबळ दावेदार आहे.

ऑस्ट्रेलियाचा स्पिनर एडम झॅम्पा यानेही फिरकीने धमाका केला. झॅम्पा या वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा दुसरा गोलंदाज आहे.

ऑस्ट्रेलियाचा अनुभवी ओपनर डेव्हिड वॉर्नर यानेही आपल्या अखेरच्या वनडे वर्ल्ड कपमध्ये धमाका केलाय. वॉर्नरने 10 सामन्यांमध्ये 528 धावा केल्या आहेत.