
टीम इंडियाकडून पराभूत झाल्यानंतर पाकिस्तानच कोट्यवधी रुपयांच नुकसान झालय. तुम्हाला प्रश्न पडला असेल, नेमकं नुकसान कुठलं आणि किती झालं? T20 वर्ल्ड कप 2024 मध्ये पाकिस्तान टीमचे आतापर्यंत दोन पराभव झाले आहेत. पहिल्या सामन्यात नवख्या अमेरिकेच्या टीमने पाकिस्तानला पराभवाचा पाणी पाजलं होतं.

आधी अमेरिका आणि आता टीम इंडियाकडून पराभव झाल्याने पाकिस्तानच सुपर-8 मध्ये पोहोचण कठीण दिसतय. पाकिस्तान टीमला सुपर-8 गाठण्यासाठी उर्वरित दोन सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागतील. त्याशिवाय भारत आणि अमेरिकेमध्ये कोणा एकाने आपल्या उरलेल्या सामन्यामध्ये खूप मोठ्या फरकाने पराभूत होणे आवश्यक आहे.

सध्या टीम इंडियाा आणि अमेरिकेने जो खेळ दाखवलाय, तो पाहता दोन्ही टीम्स इतका खराब खेळ दाखवतील याची शक्यता कमी आहे. म्हणजे पाकिस्तानी टीमवर ग्रुप स्टेजमधून बाहेर होण्याचा धोका आहे.

पाकिस्तानी क्रिकेट टीम ग्रुप स्टेजमधून बाहेर गेली, तर टुर्नामेंटमध्ये त्यांचा शेवट 9 ते 12 व्या स्थाना दरम्यान होऊ शकतो.

असं झाल्यास पाकिस्तानी टीमला 2 कोटी रुपये मिळतील. ICC कडून 9 ते 12 व्या स्थानावर राहणाऱ्या टीमना एवढी रक्कम मिळणार आहे.