RCB vs MI: …जर आरसीबीला सामना जिंकायचा असेल तर दोन बदल करणं आवश्यक, काय ते जाणून घ्या

आयपीएल 2026 स्पर्धेत आरसीबीचं प्लेऑफचं गणित काही सुटलेलं नाही. आरसीबी संघ 12 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. पण 16 गुणांचं गणित सोडवण्यासाठी उर्वरित 4 पैकी दोन सामन्यात विजय मिळवणं भाग आहे. असं असताना मुंबई इंडियन्सचं तगडं आव्हान असणार आहे. या सामन्यात जिंकण्यासाठी दोन बदल अपेक्षित आहेत.

| Updated on: May 09, 2026 | 5:46 PM
1 / 5
आयपीएल 2026 स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने चांगली सुरूवात केली. पण मागच्या दोन सामन्यात झालेल्या सलग दोन पराभवामुळे प्लेऑफचं गणित लांबलं आहे. त्यामुळे आता उर्वरित चार पैकी दोन सामन्यात विजय मिळवायचा असेल तर प्लेइंग 11 मध्ये बदल करणं गरजेचं आहे.  (Photo: IPL)

2 / 5
रोमॅरिओ शेफर्डने आयपीएल स्पर्धेत एकूण 10 सामने खेळला आहे. त्याने 55 चेंडूत फक्त 79 धावा केल्या आहे. त्याचा स्ट्राईक रेट हा 143.64चा आहे. तसेच गोलंदाजीत 102 चेंडूत 222 धावा दिल्या आहेत. त्याचा इकोनॉमी रेट हा 12.94 प्रति षटक आहे. इतकंच काय तर फक्त 5 विकेट मिळाल्या आहेत. (Photo: IPL)

3 / 5
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा यष्टीरक्षक-फलंदाज जितेश शर्माची बॅटही चालली नाही. त्याने खेळलेल्या 10 सामन्यांमध्ये 59 चेंडूंचा सामना करत फक्त 64 धावा केल्या आहेत. त्याने 10च्या सरासरीने धावा केल्या आहेत. अष्टपैलू म्हणून रोमारियो शेफर्ड आणि फलंदाज म्हणून जितेश शर्मा येथे पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. (Photo: IPL)

4 / 5
आरसीबीने रोमारियो शेफर्डऐवजी वेंकटेश अय्यरला अष्टपैलू म्हणून संधी देणं आवश्यक आहे. वेंकटेश अय्यर कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करू शकतो. इतकंच काय तर एक-दोन षटकं गोलंदाजीही करू शकतो. त्यामुळे त्याला संधी देणं आवश्यक आहे. (Photo: IPL)

5 / 5
आरसीबी यष्टीरक्षक जितेश शर्माच्या जागी इंग्लंडचा स्फोटक फलंदाज जॉर्डन कॉक्सला खेळवू शकते. कॉक्स हा देखील एक यष्टीरक्षक-फलंदाज असून तो यष्टीरक्षणाची जबाबदारी सांभाळेल. मधल्या फळीत वेगाने धावा करण्याची क्षमता त्याच्याकडे आहे.  (Photo: IPL)

Follow Us