
यंदाच्या विश्वचषकात भारतीय क्रिकेट टीम सुरुवातीचे दोन्ही सामने पराभूत झाली. त्यानंतर बुधवारी अफगाणिस्तानला नमवत भारताने विजयाचं खातं खोललं. या सामन्यात भारताचे सलामीवीरी केएल राहुल आणि रोहित शर्मा यांनी तुफान खेळी केली. राहुलने 69 आणि रोहितने 74 धावा करत 13 वर्षांपूर्वीचं अर्थात 2007 च्या विश्वचषकातील एक रेकॉर्ड तोडला.

रोहित आणि राहुलने सलामीला येत तब्बल 140 धावांची भागिदारी केली. पुरुष टी20 विश्वचषकात भारतीय संघाकडून करण्यात आलेली ही सर्वात मोठी भागिदारी ठरली आहे.

याआधी पुरुष टी20 विश्वचषकात भारताकडून वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर यांनी 2007 मध्ये 136 धावांची भागिदारी केली होती.

त्यानंतर भारताकडून 2014 च्या टी20 विश्वचषकात रोहित आणि विराटने वेस्टइंडीजविरुद्ध 106 धावांची भागिदारी केली होती.

कोहली आणि रोहितने 2014 च्याच विश्वचषकात बांग्लादेशविरुद्धही शतकीय भागिदारी केली होती.