Viral Video: मराठी गाण्यावर चिमुकलीचे भन्नाट नृत्य व्हायरल, 2.6 कोटी लोकांनी व्हिडीओ पाहिला …
लहान मुलींनी केलेल्या नृत्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. परंतू एका सहा वर्षांच्या मुलीने केलेल्या नृत्याचा व्हिडीओ अलिकडे खूपच व्हायरल होत आहे.

Viral Video: आजकाल सोशल मीडियावर टॅलेंटची काही कमी नसते. परंतू जेव्हा लहान मुलांची कला (Talented Kids) सादर होते, तेव्हा सर्वांनाच त्याचे कौतूक वाटत असते. याच लाटेत आता एका सहा वर्षाच्या चिमुरडीचा डान्स व्हायरल झाला आहे.तिच्या लटक्या टुमक्यांनी नेटिझन्स मंत्रमुग्ध झाले आहेत. आपण चर्चा करीत आहोत ती अहमदाबादच्या छोट्या इन्फ्लुएंसर आन्या जिमी पटेल हीची जिचा व्हिडीओ अलिकडे इंटरनेटवर वेगाने व्हायरल होत आहे.
व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओतील आन्या एकदमच मराठी मुलीच्या अवतारात दिसत आहे. ट्रेंडिंग मराठी ट्रॅक ‘सुंदरी-सुंदरी’ या गाण्यावर ती आत्मविश्वासाने नृत्य करत आहे.तिचा हा उत्साह आणि नृत्य पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसत आहे. इतकी लहान मुलगी मोठ्या डान्सरना फिकी पाडू शकते, असे तिचे पदलालित्य आणि लटके, झटके नटखट मुरडणे देखणे दिसत आहे.
आन्या ही इंस्टाग्रामवर @adorable_aanyaa या अकाऊंटने प्रसिद्ध आहे.तिच्या अलिकडच्या व्हिडीओच्या लोकप्रियतेचा अंदाज तु्म्ही यावरुन लावू शकता की आतापर्यंत या व्हिडीओला 2.6 कोटीहून जास्त व्यूज मिळालेले आहेत. आणि हा व्हिडीओ 21 लाखांहून अधिक लोकांनी लाईक्स केला आहे. व्हिडीओ शेअर करताना आन्या हीने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की या लुकमध्ये मराठी मुलीचा स्वॅग कसा आहे ? यावर चाहत्यांच्या प्रतिक्रीयांचा पाऊस पडला आहे. कोणी तिला लाडाने छोटा पॅकेट, मोठा धमका ! तर अनेकजण तिच्या या नखऱ्याने हैराण झाले आहेत.
कोण आहे आन्या जिमी पटेल ?
केवळ 6 वर्षांच्या आन्या हीने कोणत्याही डान्स अकादमीतून शिक्षण घेतलेले नाही. तिच्या मेहनत आणि डान्स शिकण्याच्या इच्छेमुळे ती घरीच नृत्य शिकली आहे.तिचे इंस्टाग्रामवर 18 लाखांहून अधिक फॉलोअर आहेत. तिचे पालक जिम्मी आणि राहुल पटेल हे अकाऊंट हँडल करतात. आन्या हीने अनेक बॉलीवूडच्या हस्तींसोबत देखील स्टेज परफॉर्म केलेला आहे. नोरा फतेही आणि भव्य गांधी सोबत तिने स्टेज शेअर केला आहे.
येथे पाहा व्हिडीओ –
View this post on Instagram
