
टेस्ट हा क्रिकेटमधील सर्वात जुना आणि लांब फॉरमॅट आहे. कसोटी क्रिकेटमध्ये गोलंदाज आणि फलंदाजाची खऱ्या अर्थाने कसोटी लागते. टेस्ट क्रिकेटमध्ये खेळाडूंच्या अनुभवाचा कस लागतो. टेस्ट क्रिकेटमध्ये एका सामन्यातील एका दिवसात 90 षटकांचा खेळ होतो. मात्र एक गोलंदाज सामन्यात जास्तीत जास्त किती ओव्हर टाकू शकतो? याबद्दल जाणून घेऊयात. (Photo Credit : Icc X Account)

आयसीसीच्या नियमांनुसार, टेस्ट क्रिकेटमध्ये एका बॉलरने जास्तीत जास्त किती ओव्हर टाकाव्यात याबाबत कोणताही नियम नाही. थोडक्यात काय तर कोणताही गोलंदाज किती ओव्हर टाकू शकतो. त्याबाबत कोणतीही मर्यादा नाही. (Photo Credit : Bcci X Account)

कोणताही गोलंदाज थकला नसेल तर कर्णधार त्याला वारंवार बॉलिंग करण्याची संधी देऊ शकतो. मात्र अनेकदा कर्णधार फिटनेसच्या दृष्टीने आणि थकवा जाणवू नये म्हणून गोलंदाजांना विश्रांती देतात. (Photo Credit : Icc X Account)

वेगवान गोलंदाजांना साधारपणे 5-7 ओव्हरचे स्पेल दिले जातात. तर फिरकी गोलंदाज अनेकदा 10-15 ओव्हर टाकतात. (Photo Credit : Bcci X Account)

दररोज 90 ओव्हर टाकल्या जातात. त्यामुळे कर्णधारावर कोणत्या बॉलरला किती ओव्हर टाकायला द्यायच्या? हे ठरवण्याची जबाबदारी असते. प्लेइंग ईलेव्हनमध्ये किती प्रमुख गोलंदाज आहेत? हे सर्व पाहून कॅप्टनला निर्णय घ्यावा लागतो. (Photo Credit : Icc X Account)

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकं टाकण्याचा विक्रम हा वेस्ट इंडिजच्या सॉनी रमाधीन यांच्या नावावर आहे. रमाधीन यांनी एका सामन्यात 129 ओव्हर (जेव्हापासून 1 ओव्हरमध्ये 6 बॉल टाकले जातात तेव्हापासून) टाकल्या आहेत. (Photo Credit : @windiescricket X Account)