IND A vs SA A: ऋतुराजचा धमाका, विराटचा रेकॉर्ड ब्रेक, टीम इंडियाचा दणदणीत विजय

India A vs SA A : तिलक वर्मा याच्या नेतृत्वात भारताच्या अ संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या अनधिकृत सामन्यात दणदणीत विजय मिळवला. भारताला विजय मिळवून देण्यात पुणेकर ऋतुराज गायकवाड याने निर्णायक योगदान दिलं.

| Updated on: Nov 13, 2025 | 11:30 PM
1 / 5
इंडिया ए विरुद्ध दक्षिण आफ्रिका ए यांच्यातील 3 अनऑफिशियल वनडे सीरिजमधील पहिल्या सामन्यात भारताने धमाकेदार सुरुवात केली. भारताने राजकोटमधील निरंजन शाह स्टेडियममध्ये दक्षिण आफ्रिका ए संघावर 4 विकेट्सने मात केली. भारताने या विजयासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. ओपनर ऋतुराज गायकवाड हा या विजयाचा हिरो ठरला. (PHOTO CREDIT- PTI)

2 / 5
ऋतुराजने या सामन्यात विजयी धावांचा पाठलाग करताना शतक झळकावलं. ऋतुराजने 129 बॉलमध्ये 117 रन्स केल्या. ऋतुराजने यासह विराट कोहली याला मागे टाकलं. (PHOTO CREDIT- PTI)

3 / 5
ओपनरच्या या शतकी खेळीनंतर ऋतुराजची सरासरी ही 56.66 इतकी झाली. ऋतुराजने यासह लिस्ट ए क्रिकेटमध्ये विराटला मागे टाकलं. आता भारतीय फलंदाजांच्या यादीत ऋतुराजच्या पुढे चेतेश्वर पुजारा विराजमान आहे. पुजाराने लिस्ट ए क्रिकेटमधdये 57.01 च्या सरासरीने धावा केल्या.  (PHOTO CREDIT- PTI)

4 / 5
दक्षिण आफ्रिका ए टीमने 50 ओव्हरमध्ये 9 विकेट्स 285 रन्स केल्या. दक्षिण आफ्रिकेसाठी डेलानो पोटगीटर याने सर्वाधिक 90 धावा केल्या. ब्योर्न फोर्टुईन याने 59 रन्स केल्या.  (PHOTO CREDIT- PTI)

5 / 5
भारताने विजयी धावांचा पाठलाग करताना ऋतुराज व्यतिरिक्त अभिषेक शर्मा याने 31 धावा केल्या. कॅप्टन तिलक वर्मा याने 39 धावांचं योगदान दिलं. नितीश कुमार रेड्डी याने 37 धावा जोडल्या. तर अखेरच्या क्षणी निशांत सिंधु याने नाबाद 29 धावांची खेळी करत भारताचा विजय निश्चित केला. (PHOTO CREDIT- PTI)