IND vs AFG: रोहित शर्माचे तीन झेल का आहेत विशेष? 13 वर्षानंतर टीम इंडियात असं घडलं आणि विक्रम रचला
अफगाणिस्तान आणि भारत यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिकेतील शेवटचा सामना सुरू आहे. या सामन्यात क्षेत्ररक्षण करणाऱ्या रोहित शर्माने कमाल केली. त्याने तीन झेल घेतले आणि खास पंगतीत स्थान मिळवलं आहे. या पंगतीत 13 वर्षानंतर भारतीय खेळाडू सहभागी झाला आहे.

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात तिसरा वनडे सामना सुरू आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकून अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी घेतली. पण त्यांच्या डावाची सुरूवात काही खास झाली नाही. पहिल्या दहा षटकात संघाने 4 महत्त्वाचे खेळाडू गमावले. (PHOTO CREDIT-PTI)

अफगाणिस्तानचे चार विकेट तंबूत पाठवण्याचं काम वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा याने केलं. या चार विकेटमधील तीन विकेट स्लिपला उभ्या असलेल्या रोहित शर्माने झेल घेत तंबूत पाठवल्या. या तीन झेलसह क्रिकेट इतिहासात एका अनोख्या विक्रमाची नोंद झाली आहे. (PHOTO CREDIT-PTI)

अफगाणिस्तानचे फलंदाज प्रसिद्ध कृष्णाच्या गोलंदाजीचा सामना करताना अडचणीत आले. या दरम्यान त्याने सुरूवातीला घेतलेले तीन विकेट खास होते. या तीन विकेट घेताना स्लिपला उभ्या असलेल्या रोहित शर्माने कोणतीच चूक केली नाही. रोहित शर्माच्या क्षेत्ररक्षणामुळे 28 धावांवर सुरूवातीचे तीन विकेट तंबूत परतले होते. (PHOTO CREDIT-PTI)

वनडे सामन्याच्या सुरूवातीला तीन फलंदाज एकाच क्षेत्ररक्षकामुळे बाद होऊन तंबूत परतण्याचा हा अनोखा विक्रम आहे. भारतीय क्रिकेट इतिहासात 13 वर्षानंतर असं पाहायला मिळालं. रोहित शर्मापूर्वी 2013 मध्ये सुरेश रैनाने श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात तीन विकेटमध्ये योगदान दिलं होतं. (PHOTO CREDIT-PTI)

रोहित शर्मा आणि सुरेश रैना यांच्याशिवाय सौरव गांगुली आणि मनोज तिवारी यांनी असा कारनामा केला आहे. वनडे क्रिकेटमध्ये कोणत्याही संघाविरुद्ध पहिले तीन विकेट घेण्यात योगदान देणारे खेळाडू ठरले आहेत. (PHOTO CREDIT-PTI)