IND vs AFG: प्रसिद्ध कृष्णाचा अफगाणिस्तानला विकेटचा ‘पंच’, चेपॉक मैदानावर पहिल्यांदाच असं घडलं
भारतीय संघाने अफगाणिस्तानला तिसऱ्या वनडे सामन्यात 9 विकेट राखून पराभूत केलं. या सामन्यात वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाने अफगाणिस्तानचा निम्मा संघ तंबूत पाठवला. त्याचा हा स्पेल विक्रमी ठरला. कसं काय ते समजून घ्या.

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तिसरा वनडे सामना चेन्नईतील एम चिदंबरम स्टेडियममध्ये पार पडला. हा सामना भारताने 9 गडी राखून पराभूत केला. या सामन्यात वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाने भेदक गोलंदाजीचं दर्शन घडवलं. (Photo: BCCI Twitter)

प्रसिद्ध कृष्णाने या सामन्यात भेदक गोलंदाजी करताना 5 विकेट घेतले. वनडे क्रिकेट कारकिर्दीत पाच विकेट घेण्याची प्रसिद्ध कृष्णाची ही पहिलीच वेळ आहे. या पाच विकेटसह त्याने एक विक्रम नोंदवला आहे. (Photo: BCCI Twitter)

चेन्नईचं चेपॉक मैदान हे फिरकीसाठी अनुकूल मानलं जातं. पण वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाने आपल्या वेगवान गोलंदाजीने हे मैदान गाजवालं. या मैदानात वनडे क्रिकेटमध्ये पाच विकेट घेणार पहिला भारतीय गोलंदाज ठरला. यापूर्वी वनडे क्रिकेटमध्ये या मैदानात भारतीय गोलंदाजाने पाच विकेट घेतल्या नव्हत्या. (Photo: BCCI Twitter)

प्रसिद्ध कृष्णाने अफगाणिस्तानच्या फलंदाजीचा कणा मोडला. त्याने एकट्याने अफगाणिस्तानच्या पाचही सलामीवीरांना बाद केले. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा तो केवळ तिसरा गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी केवळ मनोज प्रभाकर आणि मोहम्मद शमी यांनीच ही कामगिरी केली होती. (Photo: BCCI Twitter)

चेन्नईच्या मैदानावर आतापर्यंतच्या सर्वोत्तम गोलंदाजीचा विक्रमही प्रसिद्ध कृष्णाच्या नावावर आहे. त्याने फक्त 23 धावांत पाच बळी घेतले. यापूर्वी वेस्ट इंडिजच्या रवी रामपॉलने 51 धावांत पाच बळी घेतले होते. (Photo: BCCI Twitter)