
केएल राहुल याच्या नेतृत्वात टीम इंडियाने 50 षटकात 5 गडी गमवून 399 धावा केल्या. वनडे क्रिकेट इतिहासात ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारताचा सर्वात मोठा स्कोअर आहे.

शुबमन गिल आणि श्रेयस अय्यर या जोडीने ऑस्ट्रेलिया विरुद्ध जबरदस्त कामगिरी केली. दोघांनी शतकी खेळी करत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. दुसऱ्या गड्याासाठी दोघांनी 200 धावांची भागीदारी केली.

शुबमन गिल आणि श्रेयस अय्यर यांनी 200 धावांची भागीदारी केली. 165 चेंडूत 200 धावा केल्या. या दोघांनी इंदुरमध्ये सचिन तेंडुलकर आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा 22 वर्षे जुना विक्रम मोडीत काढला.

सचिन आणि लक्ष्मणने 2001 मध्ये इंदुरमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध 199 धावांची भागीदारी केली होती. आता 22 वर्षानंतर शुबमन गिल आणि श्रेयस अय्यर यांनी 200 धावांची भागीदारी केली आहे.

देशांतर्गत मैदानात ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडे सामन्यातील सर्वात मोठी भागीदारी ठरली आहे. 2023 मध्ये शुबमन गिल-श्रेयस अय्यर 200, 2001 मध्ये सचिन-लक्ष्मण 199 आणि 2019 मध्ये रोहित-धवन 193 धावांची भागीदारी केली आहे.

शुबमन गिल याने वनडे क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच 200 धावांची भागीदारी केली आहे. श्रेयस अय्यर त्याला उत्तम साथ मिळाली. यापूर्वी 2023 मध्ये श्रेयस अय्यरने 7 वेळा शतकी भागीदारी केली आहे. (सर्व फोटो - BCCI Twitter)