
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया वर्ल्ड कप फायनल सामन्याला आता अवघे काही तास उरले आहेत. हा महाअंतिम सामना 19 नोव्हेंबरला अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे.

या सामन्याआधी टीम इंडियाच्या खेळाडूंना ऑप्शनल प्रॅक्टीसमध्ये सहभाग घेतला. भारतीय खेळाडूंनी हेड कोच राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनात जोरदार सराव केला. आयसीसी सरावाचे फोटो शेअर केले आहेत.

कॅप्टन रोहित शर्मा याने फिल्डिंगचा सराव केला. रोहितने प्रॅक्टीस सेशलमध्ये स्लिपमध्ये कॅच घेण्याचा सराव केला.

ऑलराउंडर रवींद्र जडेजा याने या स्पर्धेत आतापर्यंत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. जडेजाने महामुकाबल्याआधी बॅटिंगचा सराव केला.

टीम इंडियाचा अनुभवी ऑलराउंडर आर अश्विन याला या वर्ल्ड कपमध्ये फारशी संधी मिळाली नाही. मात्र त्यानंतरही ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्याआधी अश्विनने सराव केला. अश्विनला ऑस्ट्रेलिया विरुद्ध संधी मिळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.