
वनडे वर्ल्डकप स्पर्धेत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अंतिम सामना होत आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजी स्वीकारली. रोहित शर्माने नेहमीप्रमाणे आक्रमक सुरुवात करून दिली. पण तीन गडी झटपट बाद झाल्याने भारतावर दबाव वाढला.

रोहित शर्माने तीन षटकार ठोकताच वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम केला आहे. रोहित शर्माने ख्रिस गेलला मागे टाकलं.आता नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.

ख्रिस गेलने इंग्लंड विरुद्ध 85 षटकार ठोकले आहेत. एखाद्या टीमविरुद्ध सर्वाधिक षटकारांचा विक्रम होता. आता रोहित शर्माने ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडेत 87 षटकार ठोकले आहेत.

रोहित शर्माने न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन यालाही मागे टाकलं आहे. 29 धावा करताच विल्यमसनचा विक्रम मोडीत काढला आहे.

वनडे वर्ल्डकपच्या एका पर्वात केन विल्यमसमनने कर्णधार म्हणून 578 धावा केल्या होत्या. 2019 वर्ल्डकपमध्ये ही कामगिरी केली होती. आता रोहित शर्माने त्याला मागे टाकलं आहे.

रोहित शर्माने 2023 वर्ल्डकप स्पर्धेत 47 धावा करत 597 धावा केल्या आहेत. त्यामुळे कर्णधार म्हणून वनडे वर्ल्डकप पर्वात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला आहे.