
टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील साखळी फेरीतील सलग 3 सामने जिंकत विजयी हॅटट्रिक लगावली. टीम इंडिया यासह ए ग्रुपमध्ये नंबर 1 ठरली. त्यानंतर आता उपांत्य फेरीत टीम इंडियासमोर ऑस्ट्रेलियाचं आव्हान असणार आहे. या सामन्यात टीम इंडियाच्या 5 शिलेदारांची कामगिरी ही विजय निश्चित करु शकते. या 5 खेळाडूंमध्ये दमदार कामगिरी करुन सामन्याचा निकाल आपल्या बाजूने फिरवण्याची ताकद आहे. टीम इंडियाचे हे पंचरत्न कोण आहेत? हे आपण सविस्तर जाणून घेऊयात. (Photo Credit : Bcci X Account)

कांगारुंनी पराभूत केल्याने टीम इंडियाचं 2023 साली वनडे वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न अधुरं राहिलं होतं. प्रत्येक भारतीय चाहत्याला हा पराभव अजूनही लक्षात आहे. त्यामुळे कर्णधार रोहितने उपांत्य फेरीत खणखणीत खेळी करुन कांगारुंना चांगलीच अद्दल घडवावी, आणि भारतीय संघाच्या विजयाचा भक्कम पाया रचावा, अशी आशा क्रिकेट चाहत्यांची असणार आहे. (Photo Credit : Bcci X Account)

विराट कोहली याने चॅम्पियन्स ट्रॉफीत पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात नाबाद आणि विजयी शतकी खेळी केली होती. तसेच विराटने कांगारुंविरुद्ध 49 सामन्यांमध्ये 2 हजार 367 धावा केल्या आहेत. त्यामुळे विराटच्या कामगिरीकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे. विराटची बॅट चालली तर कांगारुंचं काही खरं नाही. (Photo Credit : Bcci X Account)

श्रेयस अय्यर याने वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेत सलग 2 शतकं करत आपली छोप सोडली होती. तसेच रविवारी 2 मार्च रोजी न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडिया अडचणीत असताना 79 धावांनी निर्णायक खेळी केली. श्रेयस मधल्या फळीतील प्रमुख फलंदाज आहे. त्यामुळे श्रेयसकडून मिडल ऑर्डरमध्ये चांगल्या खेळीची अपेक्षा असेल. (Photo Credit : Bcci X Account)

मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्ती याने न्यूझीलंडविरुद्ध सर्वाधिक 5 विकेट्स घेत टीम इंडियाचा विजय सोपा केला. त्यामुळे वरुणला संधी मिळाल्यास त्याची कांगारुंविरुद्धची कामगिरी ही निर्णायक ठरेल, यात काडीमात्र शंका नाही. (Photo Credit : Bcci X Account)

ऑलराउंडर हार्दिक पंड्याकडून बॅटिंग आणि बॉलिंगद्वारे उल्लेखनीय कामगिरी अपेक्षित असणार आहे. हार्दिकने अनेकदा टीम इंडियासाठी संकटमोचकाची भूमिका बजावली आहे. हार्दिकने न्यूझीलंडविरुद्ध अखेरच्या क्षणी 40 पेक्षा अधिक धावांची खेळी करत फिनिशिंग टच दिला होता. तशीच छोटेखानी का होईना पण निर्णायक खेळीची हार्दिककडून अपेक्षा असणार आहे. तसेच बॉलिंगनेही योगदान अपेक्षित असणार आहे. (Photo Credit : Bcci X Account)