
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका 23 नोव्हेंबरपासून खेळली जाणार आहे. त्यामुळे या मालिकेत हार्दिक पांड्याचं खेळणं कठीण आहे, असंच दिसत आहे. त्यामुळे टी20 मालिकेसाठी कर्णधारपदाची धुरा कोणाच्या खांद्यावर द्यायची हा प्रश्न आहे.

हार्दिक पांड्याच्या गैरहजेरीत टीम इंडियाचं नेतृत्व सूर्यकुमार यादव किंवा ऋतुराज गायकवाड यांच्यापैकी एकाच्या खांद्यावर दिली जाण्याची शक्यता आहे.

ऋतुराजच्या नेतृत्वात टीम इंडियाने आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं होतं. तर सूर्यकुमार याद सध्या विश्वचषक खेळत आहे. त्यामुळे या दोघांपैकी एकाच्या नावाचा विचार होईल.


अभिषेक शर्मा, रियान पराग, भुवनेश्वर कुमार यांना संधी मिळणार का? याची उत्सुकता आहे. अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समिती भुवनेश्वर कुमार याला शेवटची संधी देऊ शकते. कारण भुवीने देशांतर्गत स्पर्धेत सात सामन्यांत 16 बळी घेतले आहेत.

बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हार्दिक पांड्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेपूर्वी फिट होण्याची शक्यता आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका 10 डिसेंबरपासून होणार आहे. पुढील वर्षी जून-जुलैमध्ये अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये टी-२० विश्वचषक होणार आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका भारतासाठी महत्त्वाची आहे. (Photo - AP))