IND vs ENG, 1st Test : शार्दुल ठाकुरच्या दोन चेंडूवर झालं असं काही, क्रीडाप्रेमींना बसला आश्चर्याचा धक्का

शार्दुल ठाकुर एका षटकात दोन विकेट घेण्यासाठी प्रसिद्ध आहे. इंग्लंड विरूद्धच्या लीड्स कसोटीतही असंच काहीसं पाहायला मिळालं. पाचव्या दिवशी शार्दुल ठाकुरन एका षटकात बेन डकेट आणि हॅरी ब्रूकची विकेट काढली.

| Updated on: Jun 24, 2025 | 10:21 PM
1 / 5
शार्दुल ठाकुरने लीड्स कसोटीच्या पाचव्या दिवशी कमाल केली. त्याने टी ब्रेकच्या आधी सलग दोन विकेट घेत इंग्लंडला धक्का दिला. इंग्लंड विजयच्या वेशीवर असताना धक्का बसला. यामुळे धावगतीत घसरण झाली. (PC-GETTY IMAGES)

2 / 5
शार्दुल ठाकुरने दुसऱ्या डावाच्या 55व्या षटकात कमाल केली. शार्दुल ठाकुरने या षटकाच्या पहिल्या चेंडूवर बेन डकेटला बाद केलं. तो 149 धावांवर खेळत होता. त्यानंतर हॅरी ब्रूकची विकेट काढली. (PC-GETTY IMAGES)

3 / 5
शार्दुल ठाकुरने पहिल्याच चेंडूवर हॅरी ब्रूकची विकेट काढून खळबळ उडवून दिली. त्याने पहिल्या डावात 99 धावांची खेळी केली होती. हॅरी ब्रूक इंग्लंडमध्ये पहिल्यांदाच शून्यावर बाद झाला. (PC-GETTY IMAGES)

4 / 5
पहिल्या डावात शार्दुल ठाकुर खूपच महागडा ठरला होता. त्यामुळे शुबमन गिलने त्याला फक्त सहा षटकं दिली होती. पण दुसऱ्या डावात त्याने कमाल केली. (PC-GETTY IMAGES)

5 / 5
शार्दुल ठाकुरची संघात निवड झाल्याने प्रश्न उपस्थित केले जात आहे. कारण पहिल्या डावात गोलंदाजीत फेल गेला आणि दोन्ही डावात फलंदाजीत काही खास करू शकला. मात्र दुसर्‍या डावात दोन विकेट घेत त्याने क्रीडाप्रेमींचं मन जिंकलं. (PC-GETTY IMAGES)