
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना हा कटकमध्ये खेळवण्यात येत आहे. इंग्लंडने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. (Photo Credit : Bcci)

टीम इंडिया या 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. टीम इंडियात माजी कर्णधाराचं 6 महिन्यांनी कमबॅक झालं आहे. (Photo Credit : Bcci X Account)

विराट कोहली याचं 6 महिन्यांनी एकदिवसीय संघात कमबॅक झालं आहे. विराटने अखेरचा एकदिवसीय सामना हा श्रीलंकेविरुद्ध 7 ऑगस्ट 2024 रोजी खेळला होता. (Photo Credit : Bcci X Account)

विराटला इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडेत गुडघ्याच्या दुखापतीमुळे खेळता आलं नव्हतं. त्यामुळे यशस्वी जयस्वाल याला संधी मिळाली होती. मात्र आता विराटचं कमबॅक झाल्याने यशस्वीला प्लेइंग ईलेव्हनमधून बाहेर पडावं लागलं आहे. (Photo Credit : Yashasvi Jaiswal x Account)

तसेच या सामन्यातून मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्ती याला पदार्पणाची संधी देण्यात आली आहे. वरुण टीम इंडियाकडून वनडे डेब्यू करणारा दुसरा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे. वरुणला कुलदीप यादव याच्या जागी प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी देण्यात आली आहे. (Photo Credit : Bcci X Account)