
इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात आकाश दीपला खेळण्याची संधी मिळाली. जसप्रीत बुमराह या सामन्यात वर्कलोड मॅनेजमेंटमुळे खेळला नाही. पण त्याची उणीव कुठेच भासली नाही. आकाशदीपने या संधीचं सोनं केलं. (Photo- BCCI)

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात आकाशदीपने 4 महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या होत्या. दुसऱ्या डावात त्याचा प्रभाव जाणवेल का? अशी धाकधूक क्रीडाप्रेमींना होती. पण त्याने दुसऱ्या डावातही स्वत:ला सिद्ध केलं. (Photo- BCCI)

आकाश दीपने कसोटी क्रिकेट कारकिर्दीत पहिल्यांदाच 6 विकेट्स घेण्याचा मान मिळवला. इंग्लंडच्या भूमीवर कसोटीत पहिलेच सहा विकेट होते. इतकेच नाही तर इंग्लंडविरुद्धच्या कसोटी क्रिकेटमध्येही हा त्याचे सहा विकेट आहेत. (Photo- BCCI)

दुसऱ्या डावात आकाशदीपने इंग्लंड संघाला बॅकफूटवर ढकललं. निम्मा संघ एकट्याने तंबूत पाठवला. यात दिग्गज खेळाडूंचा समावेश होता. बेन डकेट, ऑली पोप, जो रूट यांना क्लीन बोल्ड केले. तर हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स आणि जेमी स्मिथ यांनाही शिकार केले. त्याने 21.1 षटकात 99 धावा देत 6 विकेट घेतल्या.(Photo- BCCI)

दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात त्याने 20 षटकांत 88 धावा दिल्या आणि 4 विकेट्स घेतल्या. पहिल्या डावात त्याने बेन डकेट, ऑली पोप, हॅरी ब्रुक आणि ख्रिस वोक्स यांना बाद केले होते. (Photo- BCCI)