
भारत आणि इंग्लंड यांच्यात पाचवा टी20 सामना सुरु आहे. मुंबईच्या वानखेडे मैदानात अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं. अभिषेक शर्माने इंग्लंडच्या गोलंदाजांना कोणतीच दया माया दाखवली नाही. गोलंदाज कोणीही असो त्याला त्याच अंदाजात उत्तर दिलं.

अभिषेक शर्माने 37 चेंडूत शतक पूर्ण केलं. अभिषेक शर्माने 37 चेंडूत 5 चौकार आणि 10 षटकाराच्या मदतीने शतक पूर्ण केलं. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट हा 270.27 चा होता. अभिषेक शर्माचं हे दुसरं शतक आहे.

टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हे तिसरं वेगवान शतक आहे. यापूर्वी डेव्हिड मिलरने बांगलादेशविरुद्ध 35 चेंडूत 2017 मध्ये वेगवान शतक ठोकलं होतं. त्यानंतर रोहित शर्माने 2017 मध्येच श्रीलंकेविरुद्ध 35 चेंडूत शतक ठोकलं होतं. आता 37 चेंडूत इंग्लंडविरुद्ध अभिषेक शर्माने शतक ठोकलं.

टीम इंडियासाठी पॉवर प्लेमधील सहा षटकं खूप चांगली गेली. भारतीय संघाने 1 गडी गमावून 95 धावा केल्या. यादरम्यान अभिषेक शर्माच्या बॅटमधून 58 धावा आल्या. तर अभिषेक शर्मा आणि तिलक वर्मा यांच्यात चांगली भागीदारी पाहायला मिळाली. दोन्ही खेळाडूंनी 36 चेंडूत 100 धावा केल्या आहेत.

अभिषेक शर्माने अवघ्या 17 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. यासह अभिषेक शर्मा एका खास पंगतीत येऊन बसला आहे. अभिषेक शर्माने वेगवान अर्धशतक ठोकणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर येऊन बसला आहे. या यादीत 12 चेंडूत अर्धशतकी खेळी करणारा युवराज सिंग पहिल्या स्थानावर आहे. (सर्व फोटो- बीसीसीआय)