
इंग्लंड विरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत टीम इंडियाने 2-1 ने आघाडी घेतली आहे . तसेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्येही मोठी झेप घेतली आहे. ऑस्ट्रेलियाला धोबीपछाड देत दुसरं स्थान गाठलं आहे. आता चौथा आणि पाचवा सामना जिंकत अव्वल स्थानावर नजर असणार आहे.

रोहितने रांची कसोटीत आणखी 32 धावा केल्या तर तो कसोटीत त्याच्या 4000 धावा पूर्ण करणारा 17वा भारतीय खेळाडू ठरेल.

कसोटीत भारतीय कर्णधार म्हणून 1000 धावा पूर्ण करण्यासाठी रोहितला आणखी 70 धावांची गरज आहे. असं झालं तर कसोटीत कर्णधार म्हणून हजार धावा करणारा टीम इंडियाचा 10वा खेळाडू ठरेल.

रोहित शर्माने आतापर्यंत तिन्ही फॉरमॅटमध्ये 593 षटकार ठोकले आहेत. आता रांची कसोटीत 7 षटकार मारले तर त्याच्या नावावर 600 षटकार होतील. अशी कामगिरी करणारा पहिला खेळाडू ठरेल.

रोहितला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये 50 षटकार पूर्ण करण्यासाठी आणखी फक्त 2 षटकारांची गरज आहे. डब्ल्यूटीसीमध्ये 50 षटकार मारणारा रोहित बेन स्टोक्सनंतरचा दुसरा खेळाडू ठरणार आहे.

रोहित शर्माने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या इतिहासात सलामीवीर म्हणून आतापर्यंत 2932 धावा केल्या आहेत. आणखी 32 धावा केल्या तर आणखी मैलाचा दगड गाठेल. डेव्हिड वॉर्नरला मागे टाकून पहिल्या स्थानावर येईल. वॉर्नरने कसोटीत सलामीला येत 2423 धावा केल्या आहेत. तसेच कसोटीतून निवृत्ती घेतली आहे.