
भारत आणि न्यूझीलंड यांच्याती तिसरा वनडे सामना 18 जानेवारीला इंदुरमध्ये खेळला जाणार आहे. या सामन्यातील विजयी संघाच्या नावावर मालिका होणार आहे. या सामन्यात सर्वांचं लक्ष कर्णधार शुबमन गिलच्या कामगिरीवर असणार आहे. त्याला कारणही तसंच आहे. (PHOTO: BCCI Twitter)

तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात शुबमन गिलने 70 धावा करताच एक विक्रम नावावर करणार आहे. विराट कोहली आणि शिखर धवन यांना मागे टाकू शकतो. सध्या शुबमन गिलला सूर गवसल्याचं दिसत आहे. (PHOTO: BCCI Twitter)

कर्णधार शुबमन गिलला 3 हजार धावा पूर्ण करण्यासाठी फक्त 70 धावांची आवश्यकता आहे. हा विक्रम करण्यासाठी फक्त 61 डाव घेईल. यामुळे वेगाने 3000 एकदिवसीय धावा पूर्ण करणारा भारतीय फलंदाज बनेल. (PHOTO: BCCI Twitter)

शुबमन गिलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 60 डावांमध्ये 56.34 च्या प्रभावी सरासरीने 2930 धावा केल्या आहेत. त्याने त्याच्या शेवटच्या दोन्ही डावांमध्ये प्रत्येकी 56 धावा केल्या आहेत. (PHOTO: BCCI Twitter)

शुबमन गिलने आतापर्यंत इंदुरमध्ये दोन सामने खेळले आहेत. दोन्ही सामन्यांमध्ये धावा केल्या आहेत. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यातही चांगल्या खेळीची अपेक्षा आहे. दुसरीकडे, गिल कर्णधार म्हणून त्याची पहिली एकदिवसीय मालिका जिंकण्याचे लक्ष्य देखील ठेवेल. (PHOTO: BCCI Twitter)