
विराट कोहली याला न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या 2 कसोटी सामन्यांमध्ये त्याच्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. विराटकडून कायमच मोठ्या खेळीची अपेक्षा असते. मात्र त्याला या मालिकेत तसं काही करता आलेलं नाही.

टीम इंडियाने न्यूझीलंड विरुद्धची 3 सामन्यांची मालिका गमावली आहे. टीम इंडिया या मालिकेत 0-2 ने पिछाडीवर आहे. तर तिसरा आणि अंतिम सामना हा 1 नोव्हेंबरपासून मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे.

न्यूझीलंडकडे तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाला पराभूत करत व्हाईटवॉश करण्याची संधी आहे. अशात टीम इंडियासाठी हा सामना प्रतिष्ठेचा आहे. त्यामुळे या अंतिम सामन्यात विराटकडून चांगल्या आणि मोठ्या खेळीची अपेक्षा असणार आहे. विराटची वानखेडे स्टेडियममध्ये कसोटीत कशी कामगिरी राहिली आहे हे जाणून घेऊयात.

विराट कोहली याने आतापर्यंत मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये एकूण 5 कसोटी सामने खेळले आहेत. विराटने या 5 सामन्यांमधील 8 डावात बॅटिंग केली आहे.

विराटने वानखेडेत 8 डावांमध्ये 469 धावा केल्या आहेत. विराटने या दरम्यान 1 शतक आणि 3 अर्धशतकं झळकावली आहेत.

विराटचा वानखेडेत 235 हायस्कोअर आहे. त्यामुळे विराटकडून पुन्हा एकदा अशाच कामगिरीची अपेक्षा असणार आहे.