AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Strait of Hormuz : स्ट्रेट ऑफ हॉर्मुझच्या संकटातून जगाला बाहेर काढण्यासाठी अमेरिकेचा मोठा निर्णय, भारतीयांनो थोडा धीर धरा

Strait of Hormuz : इराण विरुद्ध इस्रायल-अमेरिकेने सुरु केलेल्या युद्धाला आज दोन आठवडे पूर्ण होतील. अजूनही अमेरिका-इस्रायलला अपेक्षित असलेले परिणाम मिळत नाहीयत. उलट इराण वरचढ ठरत चालला आहे. आता अमेरिकेने एक मोठा निर्णय घेतलाय.

Strait of Hormuz : स्ट्रेट ऑफ हॉर्मुझच्या  संकटातून जगाला बाहेर काढण्यासाठी अमेरिकेचा मोठा निर्णय, भारतीयांनो थोडा धीर धरा
Warship
| Updated on: Mar 14, 2026 | 10:40 PM
Share

मिडिल ईस्टमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने एक मोठ पाऊल उचललं आहे. अमेरिकेचे जवळपास 2500 मरीन सैनिक आणि एक युद्धनौका पश्चिम आशियाच्या दिशेने रवाना होत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, एका अधिकाऱ्याने सांगितलं की, 31 वी मरीन एक्सपेडिशनरी युनिट आणि यूएसएस त्रिपोलीला पश्चिम आशियाच्या दिशेने जाण्यास सांगण्यात आलं आहे. यामुळे क्षेत्रात सैनिकांची संख्या वाढणार आहे. इराणकडून होर्मुज स्ट्रेटमध्ये जहाजांवरील वाढते हल्ले आणि धोक्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने मिडिल ईस्टमधील आपली सैन्य उपस्थिती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेच्या संरक्षण विभागाने 2500 मरीन सैनिक आणि एका युद्धनौकेला पश्चिम आशियासाठी रवाना होण्याचे आदेश दिले आहेत. समुद्री मार्गाची सुरक्षा आणि लगेच प्रत्युत्तर देण्याची क्षमता वाढवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं आहे.

संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांनी संयुक्त राज्य सेंट्रल कमांडचा अर्ज मंजूर करत मरीन एक्सपेडिशनरी यूनिटला इराण जवळ तैनात होण्याचा आदेश दिलाय. अमेरिकी अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. या योजनेतंर्गत जवळपास 2,500 मरीन सैनिकांना मिडिल ईस्टला पाठवलं जात आहे. त्याशिवाय कमीत कमी एक युद्धनौका तिथे पोहोचेल. होर्मुज स्ट्रेटमधून वाहतूक करणाऱ्या जहाजांच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झालेला असताना हे पाऊल उचलण्यात येतय.

हे युनिट काय करु शकतं?

या तैनातीत 31 व्या मरीन एक्सपेडिशनरी यूनिटचे सैनिक सहभागी आहेत. त्याशिवाय यूएसएस त्रिपोली युद्धनौकेला मिडिल ईस्टला रवाना करण्यात येतय. या जहाजावरील सैनिक हेलिकॉप्टर्स आणि सैन्य उपकरणांद्वारे समुद्री मोहिमात वेगाने कारवाई करण्यासाठी सक्षम मानले जातात. या तैनातीमुळे अमेरिकेची मिडिल ईस्टमधील ताकद वाढणार आहे. मरीन एक्सपेडिशनरी युनिट संकट काळात लगेच प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज असतात. हे पथक समुद्रातून हल्ला करणं, आपातकालीन सैन्य अभियान आणि अस्थिर क्षेत्रात वेगवान पावलं उचलण्यासाठी सक्षम असतात. म्हणून जगातील संकटग्रस्त भागात या युनिटला तैनात केलं जातं.

सर्वात मोठं मरीन ट्रेनिंग सेंटर्स पैकी एक

अमेरिकेतील कॅलिफोर्नियाच्या मरीन कॉर्प्स एअर ग्राउंड कॉम्बॅट सेंटर ट्वेंटी नाइन पाम्समधून हे सैनिक येत असल्याची शक्यता आहे. हे अमेरिकेतील सर्वात मोठं मरीन ट्रेनिंग सेंटर्स पैकी एक आहे. इथून ट्रेंड होणाऱ्या सैनिकांना संकट काळात वेगवेगळ्या क्षेत्रात पाठवलं जातं.

होर्मुज स्ट्रेट का महत्वाचं ?

होर्मुज स्ट्रेट जगातील महत्वाच्या तेल मार्गांपैकी एक आहे. याच मार्गाने जगातील सर्वाधिक कच्चं तेल समुद्री मार्गाने पाठवलं जातं. अलीकडे या मार्गावर जहाजांवर हल्ले वाढल्याने जागतिक तेल पुरवठ्याचं संकट निर्माण झालं आहे.

Follow Us
अंगावर भागलपुरी शाल, कानांवर रुमाल अन्... एका मतासाठी BMC तील नगरसेवक
अंगावर भागलपुरी शाल, कानांवर रुमाल अन्... एका मतासाठी भाजपनं BMC तील नगरसेवकाला रुग्णालयातून आणलं, Video व्हायरल
देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेल्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण?
देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेल्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण? बड्या नेत्याचं भाकित ऐकून चकित व्हाल
पुन्हा केंद्र सरकारचं टेन्शन वाढलं? मोर्चा थेट पंतप्रधानांच्या निवास..
पुन्हा केंद्र सरकारचं टेन्शन वाढलं? मोर्चा थेट पंतप्रधानांच्या निवासस्थानाकडे... नेमकं प्रकरण काय?
एरवी सर्व विषयांवर बोलणारे शहा प्रधानांच्या विषयावर गप्प, म्हणजे...
एरवी सर्व विषयांवर बोलणारे शहा प्रधानांच्या विषयावर गप्प, म्हणजे... फडणवीसांचा उल्लेख करत बड्या नेत्याचा धक्कादायक दावा
धनंजय मुंडेंचा कमबॅक? आता चमत्कार दाखवावा लागेल, येणारा काळ आपलाच...
धनंजय मुंडेंचा कमबॅक? आता चमत्कार दाखवावा लागेल, येणारा काळ आपलाच... मुंडेंच्या भाषणाची जोरदार चर्चा
माझा फोन हिसकावला, खूप मारलं नंतर... अभिजीत दीपके
Exclusive | माझा फोन हिसकावला, खूप मारलं नंतर... अभिजीत दीपकेने सांगितलं जंतर-मंतरवर पहिल्या दिवशी काय घडलं?
वाईतील महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा; देवस्थानात...
वाईतील महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा; पाणी देवस्थानात शिरल्यानंतरही भक्तिभावाने महाआरती
भोंदू खरात अडचणीत येण्याची शक्यता, बनावट खाते प्रकरणात, नवी माहिती...
Ashok Kharat | भोंदू खरात अडचणीत येण्याची शक्यता, बनावट खाते प्रकरणात...नेमकी नवी माहिती काय?
धरणाचे 30 दरवाजे पूर्ण उघडले, तब्बल 1 लाख 70 हजार क्युसेकने...
Rain Update | धरणाचे 30 दरवाजे पूर्ण उघडले तरी... तब्बल 1 लाख 70 हजार क्युसेकने विसर्ग सुरु
मिमिक्री आर्टिस्ट, स्टँडअप कॉमेडियन...; साटम यांनी राज ठाकरेंना डिवचलं
Ameet Satam on Raj Thackeray | मिमिक्री आर्टिस्ट, स्टँडअप कॉमेडियन म्हणत...; अमित साटम यांनी राज ठाकरेंना डिवचलं