
टीम इंडियाने सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडवर मात करत फायनलमध्ये धडक मारली. टीम इंडियाकडून श्रेयस अय्यर आणि विराट या दोघांनी शतकी खेळी केली. मात्र मोहम्मद शमी याने टाकेलला एक बॉल हा निर्णायक ठरला.

विराट कोहली 117, श्रेयस अय्यर 105 आणि शुबमन गिल याने केलेल्या 80* धावांच्या जोरावर टीम इंडियाने न्यूझीलंडसमोर 398 धावांचं आव्हान ठेवलं.

मोहम्मद शमी याने न्यूझीलंडला सावध सुरुवातीनंतर 2 झटके दिले. मात्र डॅरेल मिचेल आणि कॅप्टन केन विलियमसन या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 181 धावांची भागीदारी केली. सामन्यातील 33 वी ओव्हर निर्णायक ठरली. शमीने एका ओव्हरमध्ये 2 विकेट्स घेतल्या. शमीने आधी केनला आऊट केलं. त्यानंतर टॉम लॅथम याला झिरोवर आऊट केलं. शमीच्या धारदार बॉलिंगच्या जोरावर टीम इंडियाने न्यूझीलंडला 327 धावांवर ऑलआऊट केलं.

शमीने टीम इंडियासाठी सर्वाधिक 7 विकेट्स घेतल्या. शमीने 7 पैकी 5 विकेट्स या टॉप 5 फलंदाजांना आऊट करत घेतल्या. शमीला या कामगिरीसाठी 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्काराने गौरवण्यात आलं.

दरम्यान टीम इंडिया आता फायनलमध्ये 19 नोव्हेंबर रोजी खेळणार आहे. दुसऱ्या सेमी फायनलमध्ये दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे. हा सामना जिंकणारा संघ अंतिम सामन्यात टीम इंडिया विरुद्ध भिडेल.