
टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात सेमी फायनल सामना होणार आहे. या सामन्याचं आयोजन हे मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये होणार आहे.

या सामन्याच्या 3 दिवसांआधी न्यूझीलंड टीम मुंबईतील दाखल झाली. न्यूझीलंडने सेमी फायनल मॅचच्या आधी वानखेडे स्टेडियमवर वॉर्मअप केला. आयसीसीने न्यूझीलंडच्या खेळाडूंचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

न्यूझीलंडच्या खेळाडूंनी वानखेडे स्टेडियममध्ये फुटबॉलने सराव केला. या वॉर्मअपमध्ये न्यूझीलंडचे अनेक खेळाडू सहभागी झाली.

भारतीय वंशाचा रचिन रवींद्र यानेही सराव केला. रचिनने या वर्ल्ड कपमध्ये साखळी फेरीत जोरदार कामगिरी केली.

न्यूझीलंड केन विलियमसन याच्या नेतृत्वात सेमी फायलनमध्ये टीम इंडिया विरुद्ध भिडणार आहे. केननेही सेमी फायनलआधी जोरदार वॉर्मअप केला.