IND vs NZ | न्यूझीलंड विरुद्ध टीम इंडियाच्या या 5 खेळाडूंवर मोठी जबाबदारी

India vs New Zealand Semi Final | वनडे वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड हे दोन्ही संघ सलग दुसऱ्यांदा आमनेसामने ठाकले आहेत. टीम इंडियाकडून या सामन्यात 5 खेळाडूंवर मोठी भूमिका आहे. कोण आहेत ते? पाहा.

| Updated on: Nov 14, 2023 | 7:08 PM
1 / 6
भारतीय क्रिकेट संघ रोहित शर्मा याच्या नेतृत्वात आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेतील सेमी फायनलमध्ये न्यूझीलंड विरुद्ध भिडणार आहे. न्यूझीलंड विरुद्ध टीम इंडियाचे 5 फलंदाज हे निर्णायक भूमिका बजावतील. कोण आहेत ते जाणून घेऊयात.

2 / 6
रोहित शर्मा याच्यावर कर्णधार आणि ओपनर अशी दुहेरी जबाबदारी आहे. रोहितकडून क्रिकेट चाहत्यांना न्यूझीलंड विरुद्ध चांगल्या सुरुवातीची अपेक्षा असणार आहे.

3 / 6
विराट कोहली याने वर्ल्ड कप 2023 मधील साखळी फेरीत शानदार कामगिरी केली. विराटला वानखेडे स्टेडियममध्ये शतक ठोकून सचिन तेंडुलकर याच्या सर्वाधिक 49 शतकांचं विश्व विक्रम ब्रेक करण्याची संधी आहे. त्यामुळे विराटच्या कामगिरीकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

4 / 6
रवींद्र जडेजा याने टीम इंडियासाठी बॅटिंग आणि बॉलिंगने दुहेरी जबाबदारी बजावली आहे. न्यूझीलंड विरुद्धही जडेजाने अष्टपैलू कामगिरी करावी, अशीच आशा क्रिकेट चाहत्यांना आहे.

5 / 6
जसप्रीत बुमराह याने आपल्या भेदक आणि धारदार बॉलिंगने प्रतिस्पर्ध्यांना गार केलंय. बुमराहने 17 विकेट्स घेतल्या.

6 / 6
मोहम्मद शमी याला सुरुवातीला काही सामन्यात संधी दिली गेली नाही. मात्र शमीला संधी मिळाली तेव्हा त्याने 2 सामन्यात 4 आणि एका सामन्यात 5 विकेट्स घेतल्या.  शमीच्या नावावर या वर्ल्ड कपमध्ये 16 विकेट्स आहेत. आता शमीकडून न्यूझीलंड विरुद्ध तडाखेदार कामगिरी अपेक्षित आहे.