IND vs NZ : न्यूझीलंडविरूद्धच्या सामन्यात अभिषेक शर्माचा झंझावात, पाच विक्रम केले नावावर

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिकेला सुरुवात झाली आहे. पहिल्याच टी20 सामन्यात अभिषेक शर्माचा झंझावात दिसला. त्याचं शतक हुकलं पण त्याने पाच विक्रम आपल्या नावावर केले.

| Updated on: Jan 21, 2026 | 9:04 PM
1 / 6
न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात अभिषेक शर्माचं वादळ घोंघावलं. त्याने नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये चौकार-षटकारांचा वर्षाव केला. त्याने फक्त 35 चेंडूत 84 धावांची खेळी केली. त्याचं शतक फक्त 16 धावांनी हुकलं. पण पाच विक्रम आपल्या नावावर केले. (PHOTO CREDIT- PTI)

2 / 6
अभिषेक शर्माने 22 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. न्यूझीलंडविरुद्ध अभिषेक शर्माचं वेगवान अर्धशतक ठरलं. यापूर्वी कोणत्याही भारतीय खेळाडू अशी कामगिरी करता आली नाही. त्याने अर्धशतक ठोकताना 4 चौकार आणि 4 षटकार मारले. म्हणजे 40 धावा  फक्त चौकार षटकाराने मिळवल्या. (PHOTO CREDIT- PTI)

3 / 6
टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 25 किंवा त्यापेक्षा कमी चेंडूत शतक ठोकण्यात अभिषेक शर्मा पुढे निघून गेला आहे. त्याने आठवेळा अशी कामगिरी केली आहे. यापूर्वी सूर्यकुमार यादव, फिल सॉल्ट आणि एविन लुईसने ही कामगिरी 7-7 वेळा केली आहे. (PHOTO CREDIT- PTI)

4 / 6
अभिषेक शर्माने न्यूझीलंडविरुद्ध एकूण 8 षटकार मारत विक्रम केला. न्यूझीलंडविरूद्ध अशी कामगिरी करणारा पहिला आशियाई खेळाडू ठरला. यापूर्वी अशी कामगिरी कोणीही केलेली नाही. (PHOTO CREDIT- PTI)

5 / 6
अभिषेक शर्माने टी20 क्रिकेटमध्ये 5000 धावा पूर्ण केल्या आहे. आतापर्यंत 130हून अधिक फलंदाजांनी अशी कामगिरी केली आहे. पण इतक्या जबरस्त स्ट्राईक रेटने कोणीही हा पल्ला गाठलेला नाही. अभिषेक शर्माचा स्ट्राईक रेट 172.54 चा आहे. (PHOTO CREDIT- PTI)

6 / 6
अभिषेक शर्माने भारताकडून टी20 क्रिकेटमध्ये 200हून अधिकच्या स्ट्राईक रेटने सर्वाधिक अर्धशतक ठोकणाऱ्या युवराज सिंगला मागे टाकलं. अभिषेक शर्माने अशी कामगिरी 6 वेळा केली आहे. तर युवराजने असं पाचवेळा केलं आहे. (PHOTO CREDIT- PTI)