
ईशान किशन केएल राहुल याच्या अनुपस्थितीत विकेटकीपर बॅट्समन अशी दुहेरी जबाबदारी बजावण्यासाठी सज्ज आहे. मात्र पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यासाठी टीम इंडियाच्या बॅटिंग ऑर्डरमध्ये बदल होणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे केएलच्या जागी ईशानला ओपनिंगला पाठवण्यात येऊ शकतं.

ईशान किशनने विंडिज विरुद्धच्या सीरिजमधील 3 सामन्यांमध्ये 52, 55 आणि 77 अशा एकूण 184 धावा केल्या होत्या. रोहितला त्या मालिकेत विश्रांत देण्यात आली होती. आता रोहितचं कमबॅक झालंय. त्यामुळे आता ईशानला कुठे खेळवायचं याबाबच चर्चा सुरु झाली आहे. ईशानने ओपनिंगला उल्लेखनीय कामगिरी केलीय. ईशानने बांगलादेश विरुद्ध ओपनिंगला येऊनच द्विशतक ठोकलं होतं.

ईशान किशन ओपनिंगला आला तर विराट कोहली याला तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावर बॅटिंगसाठी यावं लागेल. त्यामुळे श्रेयस अय्यर पाचव्या स्थानी खेळेल. त्यामुळे हार्दिक पंड्या सहाव्या स्थानी येईल. तसेच सूर्यकुमार यादव याला संधी मिळण्याबाबत शंका आहे.

सूर्यकुमार यादव याला टी 20 प्रमाणे वनडे क्रिकेटमध्ये आपली छाप सोडता आलेली नाही. त्यामुळे सूर्यकुमार याला प्लेईंग इलेव्हमध्ये संधी मिळण्याबाबत शंका आहे. सूर्याला संधी मिळाली, तर श्रेयसला त्याग करावा लागेल. बॅटिंग ऑर्डरबाबत आणखी एक पर्याय आहे. ईशान वनडाऊन आल्यास विराट चौथ्या आणि श्रेयस पाचव्या स्थानी खेळेल. तर रोहित आणि शुबमन ओपनिंग करतील.

ईशान किशन याला मिडल ऑर्डरमध्येही बॅटिंगसाठी पाठवलं जाऊ शकतं. ईशान चौथ्या स्थानी 4 वेळा खेळला आहे. ईशानने या 4 पैकी 2 वेळा अर्धशतक ठोकलेत. तसेच ईशानला पाचव्या क्रमांकावरही पाठवलं जाऊ शकतं. मात्र ईशान अद्याप पाचव्या क्रमांकावर खेळलेला नाही.