
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या चौथ्या पर्वात भारत आणि दक्षिण अफ्रिका आमनेसामने येणार आहेत. दोन सामन्यांची कसोटी मालिका पुढच्या प्रवासासाठी खूपच महत्त्वाची आहे. असं असताना विक्रमांच्या दृष्टीनेही या मालिकेकडे पाहीलं जात आहे. दरम्यान भारताच्या तीन फलंदाजांनी दक्षिण अफ्रिकेविरुद्ध द्विशतक आणि एका फलंदाजाने त्रिशतक ठोकलं आहे. (फोटो- बीसीसीआय)

भारत आणि दक्षिण आफ्रिका कसोटी सामन्यात फक्त एकदाच त्रिशतक झळकावले आहे. भारताचा सलामीवीर वीरेंद्र सेहवागने ही कामगिरी 2008 मध्ये केली होती. चेन्नई येथे खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 319 धावांची धमाकेदार खेळी केली. (फोटो-एएफपी)

भारताकडून वीरेंद्र सेहवागनंतर विराट कोहलीची बॅट दक्षिण अफ्रिकेविरुद्ध तळपली होती. त्याने 2019 मध्ये दक्षिण अफ्रिकेविरुद्ध नाबाद 254 धावा केल्या होत्या. हा सामना पुण्यात खेळला गेला होता. आता विराट कोहलीने कसोटीला रामराम ठोकला असून फक्त वनडे मालिका खेळत आहे. (फोटो- पीटीआय)

2019 मध्ये रांची येथे खेळल्या गेलेल्या कसोटीत रोहित शर्माने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 212 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली होती. विराट कोहलीसारखंच रोहित शर्माने कसोटी क्रिकेटला रामराम ठोकलं आहे. तसेच फक्त वनडे सामने खेळणार आहे. (फोटो- पीटीआय)

2019 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीत मयंक अग्रवालने 215 धावाही केल्या होत्या. हा सामना विशाखापट्टणममध्ये खेळला गेला होता. आता भारत दक्षिण अफ्रिका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाईल. या मालिकेत भारताचा कोणता फलंदाज 200 धावांचा टप्पा ओलांडू शकतो हे पाहणे औत्सुक्याचं ठरेल. (फोटो- बीसीसीआय)