
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेतील अत्यंत महत्त्वाची कसोटी मालिका भारत दक्षिण अफ्रिका यांच्यात सुरू आहे. नाणेफेकीचा कौल दक्षिण अफ्रिकेच्या बाजूने लागला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली. पण भारताने दक्षिण अफ्रिकेला फक्त 159 धावांवर रोखलं. जसप्रीत बुमराहने निम्मा संघ तंबूत पाठवला. (Photo- BCCI Twitter)

जसप्रीत बुमराहने कसोटी कारकिर्दीत 16व्यांदा एका डावात 5 विकेट घेण्याचा कारनामा केला आहे. जसप्रीत बुमराह ईडन्स गार्डनवर पहिल्यांदाच कसोटी सामना खेळत आहे. यात त्याने पहिल्याच सामन्यात 5 विकेट घेतल्या. (Photo- BCCI Twitter)

जसप्रीत बुमराहने SENA देशांविरुद्ध (दक्षिण अफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया) या देशांविरुद्ध 13व्यांदा पाच विकेट घेण्याचा मान मिळवला आहे. यापूर्वी सेना देशांविरुद्ध कोणत्याही आशियाई गोलंदाजांनी इतक्यांदा पाचहून अधिक विकेट घेण्याचा मान मिळवला नाही. (Photo- BCCI Twitter)

जसप्रीत बुमराहने पाकिस्तानच्या वसीम अक्रमचा विक्रम मोडीत काढला आहे. त्याने 12वेळा पाचहून अधिक विकेट घेतल्या होत्या. मात्र आता हा विक्रम बुमराहच्या नावावर झाला आहे. बुमराहने दक्षिण अफ्रिकेविरुद्ध चौथ्यांदा पाच विकेट घेतल्या आहेत. यासह त्याने श्रीनाथ आणि हरभजन सिंगची बरोबरी केली आहे. (Photo- BCCI Twitter)

जसप्रीत बुमराहने 14 षटकात 5 निर्धाव षटकं टाकली आणि 27 धावा देत 5 विकेट घेतल्या. यात रियान रिकल्टन, एडन मार्करम, टोनी डी जॉर्जी, हार्मर आणि केशव महाराज यांच्या विकेट आहेत. (Photo- BCCI Twitter)