
कर्णधार रोहित शर्मा याने श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात पहिल्या चेंडूवर चौकार मारला. पण दुसऱ्या चेंडूवर तंबूत परतला. त्यामुळे कोट्यवधी क्रीडारसिकांचा भ्रमनिरास झाला. मोठी फटकेबाजी पाहता येईल अशी आस होती. पण तसं झालं नाही. वनडे क्रिकेटमध्ये रोहितला वानखेडे हवं तसं लाभलं नाही. (Photo : Twitter)

वानखेडे स्टेडियम हे रोहित शर्मा याचं होमग्राउंड आहे. पण या मैदानावर वनडे फॉर्मेटमध्ये 20 पेक्षा जास्त धावा करू शकला नाही. रोहित शर्माने या मैदानात आतापर्यंत तीन वनडे सामने खेळले आहेत. श्रीलंकेविरुद्ध हा चौथा सामना आहे. (Photo : Twitter)

रोहित शर्मा याने 2015 मध्ये दक्षिण अफ्रिकेविरुद्ध पहिला वनडे सामना खेळला होता. या सामन्यात त्याने 16 धावा केल्या होत्या. 2017 मध्ये न्यूझीलंड विरुद्ध सामना खेळताना 20 धावा करून बाद झाला होता. (Photo : Twitter)

2020 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध तिसरा वनडे सामना याच मैदानात खेळला होता. फक्त 10 धावा करून तंबूत परतला होता. म्हणजेच आतापर्यंत खेळलेल्या चार वनडे सामन्यात 16,20,10,4 धावा केल्या आहेत. (Photo : Twitter)

रोहित शर्मा याने आतापर्यंत खेळलेल्या सात सामन्यात 402 धावा केल्या आहेत. या सामन्यात त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. पण तसं झालं नाही. (Photo : Twitter)

भारताने श्रीलंकेविरुद्धचा सामना जिंकल्यास उपांत्य फेरीचं निश्चित होणार आहे. असंही टीम इंडिया उपांत्य फेरीसाठी पात्र आहे. त्यामुळे एक विजय त्यावर मोहोर उमटवेल. (Photo : Twitter)