
इंडिया ए टीमने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या अनऑफीशीयल टेस्ट मॅचमधील दुसऱ्या डावात चाबूक बॅटिंग केली. भारताने बीसीसीआयच्या बंगळुरुतील सेंटर ऑफ एक्सीलेंस ग्राउंड 1 मध्ये दुसरा डाव हा 382 धावांवर घोषित केला. भारताने यासह दक्षिण आफ्रिका ए समोर 417 धावांचं आव्हान ठेवलं. भारताला 400 पेक्षा अधिक धावांची आघाडी मिळवून देण्यात कॅप्टन ऋषभ पंत यानेही योगदान दिलं. (Photo Credit : PTI)

पंतला दुसऱ्या डावात बॅटिंग करताना दुखापत झाली. पंतला 3 बॉलमध्ये 3 वेळा दुखापत झाली. त्यामुळे पंतला नाईलाजाने रिटायर्ड हर्ट होऊन मैदानाबाहेर जावं लागलं. (Photo Credit : PTI)

पंत 22 चेंडूत 1 सिक्स आणि 2 चौकारांच्या मदतीने 17 रन्स केल्या आणि रिटायर्ड हर्ट होऊन मैदानाबाहेर गेला. मात्र पंतने दुखापतीनंतरही टीमसाठी कमबॅक केलं आणि निर्णायक खेळी साकारली. (Photo Credit : PTI)

पंतने रिटायर्ड हर्ट होऊन परतल्यानंतर फटकेबाजी केली. पंतने एकूण 65 धावा केल्या. पंतने या खेळीत 5 चौकार आणि 4 षटकार लगावले. पंतची दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी निवड करण्यात आली आहे. त्यामुळे या मालिकेच्या पार्श्वभूमीवर पंतची ही खेळी टीम इंडियासाठी दिलासदायक आहे. तसेच पंतच्या दुखापतीमुळे चाहत्यांची चिंता वाढली होती. मात्र पंतने वाघाप्रमाणे कमबॅक केलं आणि चाहत्यांची मनं जिंकली. (Photo Credit : PTI)

ऋषभ पंत दक्षिण आफ्रिके विरुद्ध कसोटी संघात कमबॅक करणार आहे. पंतला इंग्लंड दौऱ्यात बॅटिंग करताना दुखापत झाली होती. त्यामुळे पंतला मायदेशात वेस्ट इंडिज विरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेला मुकावं लागलं होतं. मात्र आता पंत आगामी कसोटी मालिकेसाठी सज्ज झाला आहे. (Photo Credit : PTI)