
इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत पायाचं बोट फ्रॅक्चर झाल्याने ऋषभ पंतला मालिका अर्धवट सोडावी लागली होती. त्यामुळे तीन महिने दुखापतीतून सावरण्यासाठी गेली होते. आता ऋषभ पंतने कमबॅक केलं असून दक्षिण अफ्रिका ए विरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिकेत खेळत आहे. हा सामना बंगळुरुच्या सेंटर ऑफ एक्सीलेंसमध्ये खेळला जात आहे. (Photo: X/PTI)

ऋषभ पंतने कमबॅक केलं तेव्हा मैदाना 18 क्रमांकाची जर्सी परिधान करून मैदानात उतरला. ऋषभ पंतच्या खांद्यावर इंडिया ए संघाची धुरा सोपवण्यात आली आहे. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहे. (Photo: X/PTI)

भारतीय क्रिकेट संघात 18 क्रमांकाची जर्सी विराट कोहलीशी निगडीत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराट कोहली 18 क्रमांकाच जर्सी परिधान करतो. विराट कोहली आता कसोटी आणि टी20 फॉर्मेटमधून निवृत्त झाला आहे. (Photo: X/PTI)

इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात ऋषभ पंतला दुखापत झाली होती. त्यामुळे दुसऱ्या डावात फ्रॅक्चर पायासह उतरला होता. त्यामुळे पाचव्या कसोटी सामन्यात खेळला नव्हता. आता ऑक्टोबरमध्ये मैदानात परतला असून नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या मालिकांसाठी सज्ज झाला आहे. (Photo: X/PTI)

दक्षिण अफ्रिका ए विरूद्धच्या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा इंडिया ए संघाच्या बाजूने लागला. कर्णधार ऋषभ पंतने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी ऋषभ पंतसाठी हा सराव सामना आहे. (Photo: X/PTI)