
आयसीसी वनडे वर्ल्ड कप इतिहासात मोठा योगायोग जुळून आला आहे. वर्ल्ड कपमध्ये 8 वर्षांनी हा योगायोग जुळलाय.

वर्ल्ड कप 2015 नंतर यंदा वर्ल्ड कप 2023 मध्ये टीम इंडिया, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या 4 संघांनी सेमी फायनलमध्ये क्वालिफाय केलं आहे.

टीम इंडिया (1) विरुद्ध न्यूझीलंड (4) यांच्यात वर्ल्ड कप 2023 मधील पहिली सेमी फायनल होणार आहे. या सामन्याचं आयोजन हे 15 नोव्हेंबर रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे.

तर दुसऱ्या सेमी फायनलमध्ये दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया भिडणार आहेत. हा सामना 16 नोव्हेंबरला कोलकातामधील इडन गार्डनमध्ये होणार आहे.

तसेच या 13 व्या वर्ल्ड कपमधील महाअंतिम सामना हा रविवारी 19 नोव्हेंबरला होणार आहे. हा महामुकाबला जगातील सर्वात मोठं स्टेडियम असलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे.