
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिला वनडे सामना होत आहे. या सामन्यात वारंवार पावसाचा व्यत्यय आल्याने 26 षटकांचा सामना खेळवण्यात आला. या सामन्यात भारताने 26 षटकात 9 गडी गमवून 136 धावा केल्या. (फोटो- BCCI Twitter)

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात भारताची सुरुवात काही चांगली झाली नाही. माजी कर्णधार रोहित शर्माकडून फार अपेक्षा होत्या. मात्र फक्त 8 धावा करून बाद झाला. जोश हेझलवूडच्या गोलंदाजीवर विकेट देऊन बसला. (फोटो- ICC Twitter)

रोहित शर्मा बाद झाल्यानंतर विराट कोहली मैदानात उतरला. त्यानेही भारतीय क्रीडाप्रेमींची निराशा केली. 8 चेंडूंचा सामना केला पण एकही धाव काढता आली नाही. मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर झेल देत बाद झाला. (फोटो- ICC Twitter)

रोहित शर्मा आणि विराट कोहली बाद झाल्यानंतर कर्णधार शुबमन गिलही काही करू शकला नाही. गिल 10 धावा करून तंबूत परतला. टीम इंडियाने 8.1 षटकात 3 गडी गमवून 25 धावा केल्या. तसेच 10 षटकात फक्त 27 धावा करू शकले. (फोटो- ICC Twitter)

2023 नंतर पहिल्यांदाच भारतीय संघाने खूपच खराब कामगिरी केली. याआधी 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुदध खराब कामगिरी केली होती. पॉवर प्लेमध्य 27 धावा केल्या होत्या. आता पुन्हा तसंच घडलं आहे. तेव्हाही भारताने 10 षटकात 27 धावा केल्या होत्या. (फोटो- BCCI Twitter)

वनडे क्रिकेटमध्ये भारताने श्रीलंकेविरुद्ध 10 षटकात सर्वात कमी धावांचा नकोसा विक्रम नोंदवला आहे. भारताने 2017 मध्ये श्रीलंकेविरुद्ध पॉवर प्लेमध्ये फक्त 17 धावा केल्या होत्या. भारताचा हा आतापर्यंत सर्वात वाईट विक्रम आहे. (फोटो- BCCI Twitter)