IND vs ENG : विजयी धावांचा पाठलाग करताना भारताचा लॉर्ड्सवर कसा आहे रेकॉर्ड, सात सामन्यापैकी…

अँडरसन तेंडुलकर कसोटी मालिकेतील तिसरा सामना निर्णायक वळणावर आला आहे. चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडने भारतासमोर विजयासाठी 193 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. पण हे लक्ष्य भारत गाठेल का? कसा आहे भारताचा रेकॉर्ड ते जाणून घ्या.

| Updated on: Jul 13, 2025 | 9:44 PM
1 / 5
भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यातील पहिला डाव बरोबरीत सुटला होता. इंग्लंडने पहिल्या डावात 387 धावा केल्या. त्याचा पाठलाग करताना भारताचा डाव 387 धावांवर आटोपला. दुसऱ्या डावात इंग्लंडने 192 धावा केल्या आणि विजयासाठी 193 धावा दिल्या आहेत.  (फोटो- बीसीसीआय ट्वीटर)

2 / 5
इंग्लंडने विजयासाठी दिलेल्या 193 धावांचं आव्हान भारत गाठेल का? असे एक ना अनेक प्रश्न भारतीय क्रीडाप्रेमीना सतावत आहेत. कारण 193 कमी धावसंख्या असली तरी इंग्लंडमध्ये गाठणं वाटते तितकं सोपं नाही. आतापर्यंतचा लॉर्ड्सवरील रेकॉर्ड कसा आहे ते जाणून घेऊयात.  (फोटो- बीसीसीआय ट्वीटर)

3 / 5
भारताने आतापर्यंत लॉर्ड्सवर 19 सामने खेळले असून त्यापैकी फक्त 4 सामने जिंकले आहेत. तर धावांचा पाठलाग करतान 7 पैकी एका सामन्यात विजय मिळाला आहे. तर 4 सामन्यात पराभव आणि दोन सामने कसेबसे ड्रॉ झाले आहेत.  (फोटो- बीसीसीआय ट्वीटर)

4 / 5
भारताने 1986 मध्ये 134 धावांचं लक्ष्य गाठलं होतं. भारताचा या स्टेडियमवरील पहिला विजय होता. तेव्हा कपिल देव कर्णधार होता. तसेच सामनावीराचा पुरस्कारही त्याला मिळाला होता. त्याने पहिल्या डावात 1 आणि दुसऱ्या डावात 4 विकेट काढल्या होत्या. तसेच दुसऱ्या डावात 10 चेंडूत नाबाद 23 दावा काढल्या होत्या.  (फोटो- बीसीसीआय ट्वीटर)

5 / 5
लॉर्ड्सवर 1932 मध्ये 346 धावांचा पाठलाग करताना 158 धावांवर, 1990 मध्ये 472 धावांचा पाठलाग करताना 247 धावांवर, 2002 मध्ये 568 धावांचा पाठलाग करातना 170 धावांवर आणि 2011 मध्ये 458 धावांचा पाठलाग करताना 196 धावांवर बाद झाले होते. (फोटो- बीसीसीआय ट्वीटर)