Champion: टीम इंडियाच्या जेतेपदासह गंभीरने रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कोच

Team India T20 World Cup Champion: टीम इंडियाने अंतिम सामन्याता न्यूझीलंडला पराभवाची धूळ चारली आणि जेतेपदावर नाव कोरलं. भारताने सलग दुसऱ्यांदा आणि वर्ल्डकप इतिहासात तिसऱ्यांदा नाव कोरलं आहे. या जेतेपदासह गौतम गंभीरच्या नावावर एक विक्रम नोंदवला गेला आहे.

| Updated on: Mar 08, 2026 | 11:56 PM
1 / 5
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताने न्यूझीलंडचा 96 धावांनी पराभव केला. या विजयासह भारताने जेतेपद आपल्या नावावर केलं. या विजयात मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याचही योगदान राहिलं. या विजयानंतर गौतम गंभीरच्या नावावर इतिहास रचला गेला आहे. (Photo- BCCI Twitter)

2 / 5
भारतीय क्रिकेटच्या इतिहासात गौतम गंभीरने मुख्य प्रशिक्षक म्हणून इतिहासात नोंद केली आहे. गौतम गंभीर मुख्य प्रशिक्षक झाल्यापासून दुसरा आयसीसी किताब आपल्या नावावर केला आहे. (Photo- BCCI Twitter)

3 / 5
गौतम गंभीरच्या प्रशिक्षकपदाखाली भारताने आयसीसी 2025 चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. त्यानंतर भारताने टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेचं जेतेपद मिळवलं आहे. भारताने दोन्ही स्पर्धेत न्यूझीलंडला पराभूत केलं हे विशेष..(Photo- BCCI Twitter)

4 / 5
टी20 वर्ल्डकप 2026 जिंकल्यानंतर गौतम गंभीर प्रशिक्षक आणि खेळाडू म्हणून 2-2 आयसीसी कप आपल्या नावावर केले आहेत. गंभीरने खेळाडू म्हणून 2007 टी20 वर्ल्डकप आणि 2021 वनडे वर्ल्ड जिंकला होता. (Photo- BCCI Twitter)

5 / 5
गौतम गंभीरसारखंच टीम इंडियानेही एक विक्रम रचला आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धेचे तीन जेतेपद मिळवणारा पहिला संघ ठरला आहे. यापूर्वी अशी कामगिरी कोणत्याही संघाला करता आलेली नाही. (Photo- BCCI Twitter)

Follow Us