
भारत दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलिया ए टीमची घोषणा करण्यात आली आहे. सप्टेंबर महिन्यात भारतात होणाऱ्या एकूण 5 सामन्यांसाठी (4 दिवसीय 2 कसोटी सामने आणि 3 अनऑफशियल वनडे) संघ जाहीर करण्यात आला आहे. या 14 सदस्यीय संघातील 3 खेळाडूंच्या कामगिरीकडे ऑस्ट्रेलियाच्या निवड समितीचं विशेष लक्ष असणार आहे. या दौऱ्यातील कामगिरीच्या आधारावर हे खेळाडू ऑस्ट्रेलियाच्या वरिष्ठ संघात जागा कायम करु शकणार की नाहीत? हे ठरवलं जाऊ शकतं. (Photo Credit : Getty Images)

ऑस्ट्रेलियाच्या या तिन्ही खेळाडूंचं कसोटी पदार्पण झालं आहे. विशेष म्हणजे या तिघांनीही टीम इंडिया विरुद्धच टेस्ट डेब्यू केलं आहे. मात्र त्यानंतर या तिघांना पुन्हा संघात स्थान मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला. त्यामुळे या त्रिकुटासाठी भारत दौरा निर्णायक असल्याचं म्हटलं जात आहे. (Photo Credit : Getty Images)

सॅम कॉन्स्टास या 19 वर्षीय फलंदाजाने डिसेंबर 2024 मध्ये मेलबर्न कसोटीतून आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं होतं. सॅमने त्या मालिकेतील 4 डावांमध्ये एकूण 113 धाावा केल्या होत्या. डेव्हिड वॉर्नर याच्या निवृत्तीनंतर ऑस्ट्रेलिया टीम मॅनेजमेंट त्याच्या सारख्याच सक्षम ओपनरच्या शोधात आहे. सॅम वॉर्नरच्या जागेसाठी दावेदार आहे. मात्र सॅमला हा दावा आणखी मजबूत करण्यासाठी आणखी धावा कराव्या लागणार आहेत. त्यामुळे सॅम भारत दौऱ्यात कशी कामगिरी करतो? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे. (Photo Credit : Getty Images)

नॅथन मॅकस्वीनी हा देखील ओपनर आहे. त्यामुळे वॉर्नरच्या जागेसाठी सॅम आणि नॅथन या दोघांमध्ये चुरस असल्याचं स्पष्ट आहे. नॅथनने टीम इंडिया विरुद्ध पर्थ कसोटीतून आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं होतं. नॅथनने त्या मालिकेतील 6 डावांमध्ये 14.40 च्या सरासरीने 72 धावा केल्या. मात्र त्यानंतर नॅथनला संधी मिळाली नाही. त्यामुळे नॅथनसाठी भारत दौरा निर्णायक ठरु शकतो. (Photo Credit : Getty Images)

टॉड मर्फी याने 2023 मध्ये नागपूरमध्ये टीम इंडिया विरुद्ध आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं होतं. टॉडने त्या मालिकेतील 4 कसोटी सामन्यांमध्ये 14 विकेट्स घेतल्या होत्या. विशेष म्हणजे मर्फीने तेव्हा भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहली याला 4 वेला आऊट केलं होतं. मात्र टॉडला आतापर्यंत फक्त 7 कसोटी सामनेच खेळण्याची संधी मिळाली आहे. टॉडकडे नॅथन लायनचा क्रिकेटमधील वारसदार म्हणून पाहिलं जात आहे. मात्र टॉडला त्यासाठी स्वत:ला सिद्ध करावं लागणार आहे. (Photo Credit : Getty Images)