INDW vs SAW : स्मृती मंधाना हॅट्रिकसाठी सज्ज, दक्षिण आफ्रिका भारतीय ओपनरला रोखणार?
Smriti Mandhana, Womens T20 World Cup 2026: भारताची उपकर्णधार आणि सलामीवीर फलंदाज स्मृती मंधाना हीने टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेत जबरदस्त सुरुवात केलीय. स्मृतीने पहिल्या दोन्ही सामन्यांत 50 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. त्यामुळे स्मृतीला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खास कामगिरीची संधी आहे. जाणून घ्या.

वुमन्स टीम इंडिया आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील आपला तिसरा सामना हा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे. या सामन्यात भारताची अनुभवी फलंदाज आणि उपकर्णधार स्मृती मंधाना हीला अर्धशतकाची हॅट्रिक करण्याची संधी आहे. (Photo Credit: PTI)

स्मृतीने वर्ल्ड कप मोहिमेतील पहिल्या 2 सामन्यांत अर्धशतक लगावलं होतं. स्मृतीने पाकिस्तान विरुद्ध 68 तर नेदरलँड्स विरुद्ध 74 रन्स केल्या होत्या. (Photo Credit: PTI)

त्यामुळे आता स्मृतीला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अर्धशतकाची हॅट्रिक करण्याची संधी आहे. स्मृतीला यासह या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत आपलं स्थान आणखी भक्कम करता येईल. (Photo Credit: PTI)

स्मृतीने टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेच्या 10 व्या पर्वात एकूण 2 सामन्यांत 142 धावा केल्या आहेत. स्मृती या पर्वात सर्वाधिक धावा करणारी फलंदाज आहे. (Photo Credit: PTI)

स्मृतीने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अर्धशतक केल्यास तिच्या या 10 व्या पर्वात 200 धावा पूर्ण होतील. त्यामुळे आता स्मृती अर्धशतकाची हॅट्रिक करण्यात यशस्वी ठरणार की नाही? याची चाहत्यांना प्रतिक्षा असणार आहे. (Photo Credit: PTI)