FIFA World Cup स्पर्धेची ट्रॉफी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हस्ते देणार, इन्फँटिनो म्हणाले…

फिफा वर्ल्डकप स्पर्धेची ट्रॉफी कोणाच्या हस्ते देणार? याबाबत चर्चा होती. फिफा अध्यक्ष जियानी इन्फँटिनो यांनी ट्रॉफी डोनाल्ड ट्रम्प यांच्या हस्ते दिली जाणार हे स्पष्ट केलं आहे. यासह राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत जियानी इन्फँटिनो संबंध आणखी मजबूत केले आहेत.

| Updated on: Jun 24, 2026 | 3:39 PM
1 / 5
फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेचा अंतिम सामना 20 जुलै रोजी न्यू जर्सीच्या मेटलाइफ स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे. अंतिम सामना जिंकणाऱ्या संघाला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हस्ते ट्रॉफी दिली जाणार आहे. या बाबती माहिती फिफा अध्यक्ष जियानी इन्फँटिनो यांनी दिली आहे. (Photo: PTI/Getty Images)

2 / 5
फिफा अध्यक्ष जियानी इन्फँटिनो यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत नातं आणखी घट्ट केलं आहे. याची सुरूवात ट्रम्प यांना फिफा शांतता पुरस्कार दिला जावा, येथून झाली होती. फिफाकडून हा पुरस्कार दिला जाण्याची सुरूवातही जियानी इन्फँटिनो यांनी केली आहे. (Photo: PTI/Getty Images)

3 / 5
जियानी इन्फँटिनो यांनी फॉक्स अँड फ्रेंड्स या कार्यक्रमात सांगितलं की, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांसोबत 20 जुलैला फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेचा आनंद लुटणार आहे. त्यानंतर अंतिम फेरीत विजयी संघाला ट्रॉफीही देणार आहेत. फिफान अध्यक्षांच्या टीव्हीवरील वक्तव्यावर सध्या तरी बोलणं टाळलं आहे. (Photo: PTI/Getty Images)

4 / 5
फिफा अध्यक्ष जियानी इन्फँटिनो यांच्या अध्यक्षतेखाली असं काही पहिल्यांदाच घडतंय असं नाही. मागच्या वर्षी ट्रम्प यांनी क्लब वर्ल्डकप विजेत्या चेल्सी संघाला ट्रॉफी दिली होती. तेव्हा काही खेळाडूंनी त्याचा विरोध केला होता. (Photo: PTI/Getty Images)

5 / 5
फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेचं यजमानपद अमेरिका, कॅनडा आणि मॅक्सिकोकडे आहे. 16 शहरात या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असून 48 संघांनी भाग घेतला आहे. फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या अंतिम फेरीत कार्यक्रमही होणार आहे. या स्पर्धेचा सांगताही जबरदस्त करण्याचा मानस आहे. (Photo: PTI/Getty Images)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us